Nagpur Weather Update
Nagpur Weather Update Sakal
नागपूर

Nagpur Weather Update : पहाटे पाऊस, दिवसभर ढगाळ वातावरण; नागपूर जिल्ह्यात आणखी दोन दिवस यलो अलर्ट

सकाळ वृत्तसेवा

Nagpur News : शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी पहाटेपासून पावसाने दमदार हजेरी लावली. सकाळी नऊ वाजेपर्यंत पाउस कोसळत होता. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून उकाड्यापासून त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला.

सकाळी दहानंतर मात्र, पाऊस गायब झाल्यानंतर दिवसभर ढगाळ वातावरण होते. शहरात २३.४ तर सर्वाधिक पाऊस उमरेड तालुक्यात ५८ मिलीमिटर झाला. आतापर्यंत जिल्ह्यात १०३.५ मिलिमिटर पाऊस पडला.

नागरिक झोपेत असताना पहाटेच्या वेळी अचानक आभाळ भरून आले. जोरदार पावसाला सुरुवात झाली. सकाळी साडेचार वाजताच्या दरम्यान संपूर्ण शहरासह जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला. जवळपास चार तास पावसाचा जोर चांगला होता.

पावसामुळे ठिकठिकाणी सखल भागांमध्ये व गल्लीबोळामध्ये पाणी साचले होते. पावसामुळे नागपूरच्या कमाल तापमानात तीन अंशांची घट झाल्याने वातावरणही गारेगार झाले. त्यामुळे घामाघूम झालेल्या नागरिकांना दररोजच्या तुलनेत उकाडा कमी जाणवला. गुरुवारच्या तुलनेत आजच्या शहरातील तापमानात १.८ अंश सेल्सियस घट झाली.

शहरातील कमाल तापमान ३२.२ अंश तर किमान तापमान २४.४ अंश सेल्यियस होते. प्रादेशिक हवामान विभागाचा आणखी दोन दिवस यलो अलर्ट असल्याने पावसाची शक्यता कायम आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: फायनलपूर्वी कॅप्टन रोहितने भारतीय संघाला काय सांगितलं होतं? सूर्याने केला खुलासा

Amol Kolhe: कधी कल्पनाही केली नव्हती, साहेबांमुळे शक्य झालं; पक्षाने मोठी जबाबदारी दिल्याने कोल्हे भावूक

Gayatri Mantra: निता अंबानींच्या लाल साडीवर सोनेरी रंगात लिहिलेल्या गायत्री मंत्राच्या जपाचे फायदे

Namrata Sambherao : हास्यजत्रा फेम नम्रता संभेरावने बांधलं नवं घर ; फोटो शेअर करताना म्हणाली "विश्वास हा सगळ्या गोष्टी..."

Pandharpur Wari : उरुळी कांचनमध्ये तुकाराम महाराजांच्या पालखीचा नगारा रोखला; घटनास्थळी पुणे पोलिस अधीक्षक दाखल

SCROLL FOR NEXT