nagpur weather update 60 homeless people die on roads in 30 days due to heat Sakal
नागपूर

Nagpur News : उन्हामुळे ३० दिवसांत ६० बेघरांचा रस्त्यावर मृत्यू ; मेयोत ४४ तर मेडिकलमध्ये १६ जणांचे शवविच्छेदन

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : अतिउष्णतेमुळेही रस्त्यावर होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण वाढले. यावर्षी नवतपात सूर्य जणू आग ओकत आहे. यामुळे फुटपाथवर, रस्त्यावर जगणाऱ्या तब्बल ६० पेक्षा अधिक बेघर निराधारांनी रस्त्यावरच प्राण सोडला असल्याची माहिती पुढे आली आहे. हे मृत्यू मेडिकल आणि मेयोच्या नोंदीत आले आहेत.

उष्माघाताने मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मात्र, प्रशासनाने हे मृत्यू उष्माघाताने झाले नसून इतर आजाराने झाल्याचा दावा केला. यामध्ये बेघर, बेवारस नागरिकांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. १ मे ते ३० मे दरम्यान मेडिकलमध्ये १६ बेवारस प्रेतांचे शवविच्छेदन झाले. तर मेयोत ४४ बेवारस मृतदेह आणले गेले त्यांची ओळख पटली नाही.

मेयो-मेडिकलमध्ये दाखल झालेल्या रुग्णांपैकी ११० रुग्णांचा मृत्यू झाला. तर ४४ बेघरांना उपचारासाठी आणले होते. त्यांना तपासाअंती मृत घोषित करण्यात आले. या ४४ मृतदेहांची ओळख न पटल्याने पोलिसांनी त्यांना वारस नसलेले म्हणून नोंद करीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.

नेमके कारण माहित असताना शवविच्छेदन का?

आप्त स्वकीयांच्या मृत्यूनंतर सारे नातेवाईक दुःखी असतात. कधी शव मिळेल आणि अंत्यसंस्कार करता येईल, याचा विचार सुरु होतो, मृत्यूचे नेमके कारण माहित असतानाही मेडिकलमधील डॉक्टर उपचारादरम्यान वॉर्डात मृत्यू झाल्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवतात.

पोलिस पंचनामा न झाल्याने सारे दुःखाने माखलेल्या वेदना सहन करत शवविच्छेदन विभागासमोर उकाड्यात तास न तास शवाच्या प्रतीक्षेत असतात. मृत्यूचे नेमके कारण माहित असतानाही शवविच्छेदन करण्यासाठी रेफर केले जात असल्याची माहिती पुढे आली आहे. यांसदर्भात प्रशासनाने चौकशी करावी अशी मागणी पेशंट फोरमतर्फे करण्यात आली आहे.

ट्रॉमात दगावतात दररोज ३ जण

दाखल रुग्णांपैकी मेडिकलच्या ट्रॉमा सेंटरमध्ये ९१ रुग्णांचा मृत्यू झाला. दररोज ट्रॉमा सेंटरमध्ये ३ रुग्णांचा मृत्यू होत असून ते वाढत असल्याचे दिसून आले. ट्रॉमातील ९१ मृत्यूसह मेडिकलमध्ये मे महिन्यात ४९१ रुग्ण दगावले आहेत. यातील ३०७ मृतांचे शवविच्छेदन करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पराभवाची हॅट्‌ट्रिक करायची असेल, तर राजन तेलींनी निवडणूक लढवावी'; दीपक केसरकरांचं थेट चॅलेंज

Latest Maharashtra News Updates Live : मुंबईत सर्वाधिक जागा भाजपला मिळणार?

जय जय स्वामी समर्थ मालिकेत स्वामी समर्थ मृत ब्राम्हणाला देणार जीवनदान ; प्रोमोची होतेय चर्चा

Chh.Sambhajinagar Assembly election 2024 : छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघात समस्यांचे बुरूज

Gold-Silver Price: दिवाळी अगोदर सोन्याचा भाव विक्रमी उच्चांकावर; चांदीही 1,000 रुपयांनी वाढली, भाववाढीचे कारण काय?

SCROLL FOR NEXT