नागपुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीसोबत झालेल्या भांडणानंतर पत्नीने आपल्या तीन वर्षांच्या निष्पाप मुलीचा गळा दाबून तिची हत्या केल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्येनंतर ही महिला आपल्या मुलीचा मृतदेह घेऊन जवळपास 4 किलोमीटर रस्त्यावर फिरत राहिली. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी रात्री उशिरा ही घटना घडल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. आरोपी महिला, 23 वर्षीय ट्विंकल राऊत आणि तिचा पती राम लक्ष्मण राऊत (वय 24) हे चार वर्षांपूर्वी नोकरीच्या शोधात नागपूरला आले होते. ते एका पेपर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीत काम करत होते आणि एमआयडीसी परिसरातील हिंगणा रोडवरील कंपनीच्या आवारात एका खोलीत राहत होते, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती पत्नीमध्ये त्यांच्या नात्यातील अविश्वासामुळे वारंवार भांडणे होत होती. सोमवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास दोघांमध्ये मोठं भांडण झालं. त्यांचा जोरदार वाद सुरू असताना त्यांची मुलगी रडायला लागली. संतापलेल्या पत्नीने आपल्या मुलीला घराबाहेर काढले आणि मुलीचा गळा दाबून तिची हत्या केली.
त्यानंतर ती चिमुरड्या मुलीचा मृतदेह घेऊन सुमारे चार किलोमीटर चालत फिरत होती. रात्री आठच्या सुमारास पोलिसांचे गस्तीचे वाहन दिसले आणि त्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी मुलीला रुग्णालयात नेले जेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले, असे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
पोलिसांनी नंतर महिलेला अटक केली आणि तिच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 302 (हत्या) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल असे त्यांनी सांगितले. महिलेला नंतर न्यायालयात हजर करण्यात आले, तिला 24 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.