Yellow American sweet corn 
नागपूर

नागपूर : 'स्वीट कॉर्न' ला अच्छे दिन

जारात पिवळ्या अमेरिकन स्वीट कॉर्नना (मधुमका) मागणी वाढली आहे

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : पावसाच्या सरी आणि गारवा या वातावरणात मक्याचे भाजलेले कणीस खाण्याचा आनंद वेगळाच असतो. पर्यटनस्थळ अथवा शहरातील अनेक भागात गरमा गरम भाजलेले कणीस खाणे हे समीकरण झालेले आहे. त्यामुळे बाजारात पिवळ्या अमेरिकन स्वीट कॉर्नना (मधुमका) मागणी वाढली आहे. परिणामी किरकोळ बाजारात या स्वीटकॉर्नच्या भावातही वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात १० रुपयांना मिळणाऱ्या मक्याची किंमत दुप्पट झाली असून एका कणसासाठी १५ ते २० रुपये मोजावे लागत आहेत.

पावसाळा सुरू झाला की बाजारात मक्याच्या कणसांची आवक वाढते. दररोज ४०० ते ५०० पोत्याची आवक होत आहे. वर्षभर हा पिवळा मका अर्थात स्वीट कॉर्न बाजारात पाहायला मिळतो. मात्र पावसाळा हा मक्याच्या कणसाचा मुख्य हंगाम असल्याने या काळात पांढरा गावठी मका बाजारात येतो. पिवळ्या स्वीट कॉर्नच्या तुलनेत तो अधिक स्वादिष्ट असल्याने त्यांना अधिक मागणी असते. जून ते डिसेंबरपर्यंत हंगाम असतो. बाजारात सध्या आवकही चांगली होत आहे.

ठेल्यांवर कणसांची विक्री

पावसाळ्यात म्हणजेच रिमझिम पडणाऱ्या पावसात भुट्ट्याचा (मक्‍याचा) आस्वाद घेतला जातो. एकट्या नागपूर शहरात ठेल्यांवर मका विक्री करणाऱ्यांची संख्या ७०० पेक्षा अधिक आहे. हातठेल्यावर प्रति नग स्वीटकॉर्न २५ रुपये, तर साधे मक्‍याचे कणीस २० रुपयांना विकले जात आहे. प्रति हातगाडीवरून दररोज सरासरी ७० ते १०० नगांची विक्री होते.

पावसाळी वातावरणामुळे स्वीट कॉर्नला मागणी वाढलेली आहे. यंदा उत्पादन चांगले असून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला आहे. नागरिक मुक्तपणे सर्वत्र फिरू लागल्याने मागणीही वाढलेली आहे. परिणामी भाव वाढलेले आहेत.

-अनिल धारकर, संचालक अनिल मणिराम धारकर फ्रूट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sada Sarvankar: सदा सरवणकर आज काय निर्णय घेणार? मध्यरात्री 'वर्षा' बंगल्यावर तासभर खलबतं

सोलापूर जिल्ह्यातील भाजप उमेदवारांच्या सभांसाठी ‘हे’ नेते फायनल! पंढरपूर, अक्कलकोट, माळशिरस, सोलापूर शहरात सभांचे नियोजन

Sakal Podcast: राज्यात हेलिकॉप्टर रुग्णवाहिका सेवा उपलब्ध होणार ते रिटेंशनमध्ये विराट कोहली सर्वात महागडा भारतीय खेळाडू

Latest Marathi News Updates : महाराष्ट्रासह केरळ, तामिळनाडू राज्यात आज पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

कोरोनातील 170 कोटींचे ऑक्सिजन प्लांट धुळखात! देखभाल दुरुस्तीसाठी तज्ज्ञ पण नाहीत अन्‌ निधीही नाही; ‘पीएसए’ प्लांटच्या ठिकाणी आता बॉटलिंगचा प्रस्ताव

SCROLL FOR NEXT