nagpur  sakal
नागपूर

Nagpur : पाचपावलीत तणाव पत्नीच्या वादातून तरुणाची आत्महत्या,मृतदेह घेऊन जमाव पोलिस ठाण्यावर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शांतनूचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - पत्नीसोबत झालेल्या वादातून तरुणाने आत्महत्या केल्याची घटना जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी रात्री ९.३० च्या सुमारास घडली. पत्नीचे वडील पाचपावली पोलिस ठाण्यात कर्तव्याला आहेत. त्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी करीत आज दुपारी रुग्णालयातून त्याचा मृतदेह थेट पाचपावली पोलिस ठाण्यावर नेला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शांतनू नरेंद्र वालदे (२७) रा. सुयोगनगर असे मृताचे नाव आहे.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

मृतदेह घेऊन जमाव पोलिस ठाण्यावर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शांतनूचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर काही दिवसांत तो भाड्याने राहायला गेला. सुरवातीचे दिवस आनंदात गेले. नंतर मात्र पती-पत्नीत वाद वाढले. सततच्या वादाला कंटाळून पत्नी माहेरी निघून गेली. शांतनू सोमवारी पत्नीला भेटायला सासरी गेला. यावेळी त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी पाचपावली पोलिस ठाण्यात शांतनूविरुद्ध गुन्ह्याही नोंदविण्यात आला.

शांतनूचे सासरे रवी गजभिये हे पाचपावली पोलिस ठाण्यात मालखानामध्ये कर्तव्यावर आहेत. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शांतनूवर गुन्हा नोंदविला. याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली. न्यायालयातून त्याला जामीन मिळाला होता.

मंगळवारी रात्री त्याने घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ माजली. कुटुंबीयांनी त्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत बघितल्यानंतर मेयो रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. बुधवारी शवविच्छेदनानंतर नातेवाईकांनी मृतदेह थेट पाचपावली ठाण्यात नेला. मुलीच्या वडिलांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी पाचपावलीचे पोलिस निरीक्षक वैभव जाधव यांना निवेदन देऊन दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.

आत्महत्येस प्रवृत्तकेल्याचा आरोप

शांतनूचे वडील नरेंद्र माजी नगरसेवक असून ते कॉन्ट्रॅक्टर आहेत. घटनेनंतर शांतून दुखावला होता. त्यामुळे तो नैराश्यात केला. पत्नीच्या वडिलांनी अपमास्पद वागणूक दिली. यातूनच त्याने आत्महत्येचे पाऊल उचलले. त्यामुळे आत्महत्येस प्रवृत्त करणारे रवी गजभिये व संबंधित दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शांतनूचे वडील नरेंद्र व कुटुंबीयांनी केली आहे. जमाव ठाण्यावर आल्यानंतर पोलिसांनी त्यांची समजूत काढली. निवेदन स्वीकारले आणि कारवाईचे ठोस आश्वासन दिल्यानंतर वालदे कुटुंबीय पार्थिव घेऊन गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivajinagar Assembly Election 2024 Result: सिद्धार्थ शिरोळे 36 हजार मतांनी विजयी; सलग दुसऱ्यांदा आले निवडून

Assembly Election Result Viral Memes : महायुतीचा एकतर्फी विजय अन् महाविकास आघाडीचा सपशेल पराभव; सोशल मीडियावर आली Memes ची लाट

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: बेलापूरमध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे विजयी

Rajesh Kshirsagar Won Kolhapur North Assembly Election : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT