National athletics player Sayali Waghmare told her Target of 2021  
नागपूर

VIDEO: टार्गेट-२०२१: 'जान हैं तो जहाँन हैं' यावर विश्वास ठेवत जग जिंकून दाखवणार; राष्ट्रीय पदकविजेती धावपटू सायलीचा निर्धार  

नरेंद्र चोरे

नागपूर : कोरोनाचं संकट येईल, अशी स्वप्नातही कुणी कल्पना केली नव्हती. मात्र या अनपेक्षित संकटाला सारेच धैर्याने तोंड देत आहेत. खेळाडूही त्याला अपवाद ठरले नाहीत. कोरोनाचा खेळाडूंना सर्वाधिक फटका बसला असला तरी, खूप काही शिकायलादेखील मिळाले. 'जान हैं तो जहाँन हैं' या मंत्रावर विश्वास ठेवत मी भूतकाळ विसरून नव्या दमाने तयारीला लागणार आणि जग जिंकून दाखवणार असल्याचे मत, राष्ट्रीय पदकविजेती धावपटू सायली वाघमारेने व्यक्त केले.

सायली म्हणाली, गेल्या दहा-बारा वर्षांत मी पहिल्यांदाच हा अनुभव घेतला आहे. मार्चमध्ये लॉकडाउन लागल्यानंतर घराबाहेर पडणे कठीण झाले होते. त्यामुळे ना सराव करू शकले, ना ही स्पर्धा होऊ शकल्यात. एकप्रकारचं नैराश्य आलं होतं. चार भिंतीच्या आड काही दिवस वर्कआऊट, कंडिशनिंग व हलका फिटनेस केल्यानंतर तीन-चार महिन्यांनी जितू सरांच्या मार्गदर्शनात रोडवर धावू लागलो. पण त्याला ट्रॅकवरील सरावाची सर अजिबात नव्हती. कसेबसे सात-आठ महिने काढल्यानंतर हळूहळू गाडी रुळावर येत आहे. 

काही निवडक खेळाडू गेल्या काही दिवसांपासून ईश्वर देशमुख शा. शि. महाविद्यालयाच्या मैदानावर सराव करत आहेत. सरावासोबतच यावर्षी स्पर्धा होऊ न शकल्याचंही खेळाडूंना दुःख आहे. खेळाडूच्या आयुष्यात एक वर्ष खूप मोठा काळ असतो. स्पर्धांसाठीच आम्ही मैदानावर घाम गाळत असतो. अजूनही शेड्युल ठरले नाही. कधी होणार हे निश्चितपणे सांगता येत नाही. कदाचित पुढचं वर्षही लागू शकते.

टायमिंग सुधारण्याचे लक्ष्य 

दादोजी कोंडदेव क्रीडा पुरस्कारविजेते भाऊ काणे आणि जितेंद्र घोरदडेकर यांच्या मार्गदर्शनात सराव करणाऱ्या २४ वर्षीय सायलीचे पहिले लक्ष्य येत्या मार्चमध्ये होऊ घातलेली राष्ट्रीय फेडरेशन स्पर्धा आहे. या स्पर्धेत आठशे मीटरमध्ये चांगली कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. विशेषतः टायमिंगमध्ये किमान दोन सेकंदाने सुधारणा करायची आहे. सद्यस्थितीत २ मिनिटे ०९.९० सेकंद तिचे बेस्ट टायमिंग आहे. 

सातत्यपूर्ण कामगिरी महत्वाची 

इतर खेळाडूंप्रमाणे सायलीचेही आशियाई व ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व अंतिम स्वप्न आहे. फिटनेस आणि सातत्यपूर्ण कामगिरी राहिल्यास भविष्यात नक्कीच स्वप्न पूर्ण होऊ शकते. सायलीने आतापर्यंत आंतर विद्‌यापीठ तसेच सबज्युनियर, ज्युनियर व युथ स्पर्धांमध्ये अनेक पदके जिंकली आहेत. मात्र २०१७ मध्ये गुटूंर येथे झालेल्या अ. भा. आंतर विद्‌यापीठ स्पर्धेत जिंकलेले सुवर्णपदक तिची सर्वांत मोठी कमाई आहे.

‘स्पर्धेच्या माध्यमातूनच खेळाडूला त्याच्यातील खऱ्या उणिवा कळत असतात. त्यावर मेहनत घेता येऊ शकते. झालेले नुकसान भरून निघणार नाही. पण थांबूही शकत नाही. स्वप्न पूर्ण करायचे असेल तर निगेटिव्हिटी बाजूला सारून भविष्याचा विचार करणे गरजेचे आहे. त्या दिशेनेच सध्या माझी तयारी सुरू आहे.
-सायली वाघमारे
राष्ट्रीय पदकविजेती धावपटू 

संपादन - अथर्व महांकाळ 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT