नागपूर : नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवसापासूनच शहर रासगरबा दांडियाच्या रंगात रंगायला लागले असून चित्रपट गीतांच्या सर्वत्र ‘ढोलीडा, वगाडा रे’ स्वर घुमत आहेत. यात युवक- युवतीच नव्हे तर वयस्व नागरिक आणि लहान मुलेही रंगल्याचे चित्र आहे.
विदर्भासह नागपुरात दुर्गापूजा उत्सव पारंपरिक तितक्याच जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा होतो. नागपुरात अनेक दुर्गा पूजा उत्सव मंडळांसह विविध संस्थांनी गरबाचे आयोजन केले आहे. वर्धमाननगर क्वेटा कॉलनी, भगवाननगर, रायसोनी कॉलेज, राधिकाबाई पांडव चॅरिटेबल ट्रस्ट, शारदानगर, वुमेन्स कॉलेज नंदनवन, गरोबा मैदान, मोतीबाग, छत्तरपूर फार्म, जेरिल लॉन, महाराजा क्लब ॲण्ड लॉन रामदासपेठ यासह इतरही दुर्गा उत्सव मंडपांमध्ये गरबाची धूम आहे. ठिकठिणी पारंपारिक वस्त्र परिधान करून युवक-युवतींसह, चिमुकले व ज्येष्ठ नागरिकही गरबा नृत्यात रंगून गेले आहेत. प्रत्येक चौकातील आकर्षक विद्युत रोषणाईने शहर उजळून निघाले आहे.
बहुतेक युवक युवती गरबा नृत्याचे प्रशिक्षण घेऊनच खेळायला जातात. आयोजकांद्वारे खास गरबा खेळण्यासाठी आमंत्रित केले आहे. त्यांच्या साथीने इतरही उपस्थित नृत्याचा ठेका धरत आहेत. प्रत्येक जण गरबाच्या रंगले असल्याने शहरभर माहोल झाला आहे.
चिमुकल्याचा गरबा ट्रेंडिंग
गरबाचे अनेक व्हिडीओ दररोज शेअर होत आहे. यात एका चिमुकल्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. अगदी तीन ते चार वर्षांचा एक चिमुकला पारंपरिक गरबा खेळत असून त्याचा हे नृत्य पाहून सगळे थक्क होत आहेत.
गीतांवर झिंगाट
पारंपरिक गरबा हा गुजराती गाण्यांवर खेळला जातो. त्याची एक लय असते. काही ठिकाणी गुजराती गाणीच वाजत असली तरी काही ठिकाणी डीजेचा झिंगाटही दिसतो. यात बॉलिवूडची आक्षेपार्ह गाणीही वाजविली जात असल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.