Navratri Festival 2022 
नागपूर

Navratri Festival 2022 : ऊर्जा आणि प्रेमाचा उत्सव गरबा; जाणून घ्या फायदे अन प्रकार

सकाळ वृत्तसेवा

भारतीय जीवन दर्शन म्हणजे एक परिपूर्ण अनुभूती आहे. या जीवनाचे एक अंग म्हणजे नृत्य होय. हे नृत्य केवळ पदविन्यास अथवा अंगविक्षेप नसून ईश्वराप्रती आदरभाव व्यक्त करीत त्याच्यात रममाण होणे होय. नऊ दिवसांच्या नवरात्रोत्सवात गरबा हा नृत्यप्रकार आता देशाच्या बहुतेक भागात लोकप्रिय झाला आहे.

पौराणिक महत्त्व

गरबा हे नृत्य उषाने पार्वतीकडून शिकले. याला लास्यनृत्य असेही म्हणतात.नंतर उषाने हे नृत्य सौराष्ट्रातील गोपींना शिकविल्याची आख्यायिका आहे. आता उषा कोण आहे? उषा ही कृष्णाची नातसून म्हणजेच प्रदूम्नचा पूत्र अनिरुद्धची पत्नी. तर उषा ही बळीपूत्र बाणासुराची कन्या होय. अनिरूध्दचे उषावर मन जडले होते. दोघांचे प्रेमसंबंध कळताच बाणासुराने अनिरुद्धला तुरूंगात टाकले. नंतर कृष्णाने बाणासुराचा वध करून अनिरूद्धची सुटका केली आणि उषाला व्दारकेला आणले. सासरी आल्यानंतर पार्वतीकडून शिकलेले नृत्य गोपिकांना शिकविले. असा गरबा नृत्याचा इतिहास आहे.

गरबा म्हणजे ऊर्जा, शक्तीची उपासना

भारतीय संस्कृतीमधील सण, उत्सव हे पृथ्वीवरील वातावरण, बदलणारे ऋतुमान, त्यानुसार शरीराला आवश्यक असणारे बदल आदी बाबींशी मिळतेजुळते आहेत. पावसाळा गेला की वातावरणातील गारवा वाढत जातो. हा गारवा सहन करण्यासाठी ऊर्जा वाढवणे आवश्यक असते. त्यामुळे खाण्यात जसे बदल करण्यात येतात. तसेच शरीराला अधिक श्रमांची सवय लावावी लागते. या विचारातून गरबा नृत्यासह नऊ दिवस देवीची अर्थात शक्तीची उपासना केली जाते.

गरब्याचे तत्वज्ञान

गरबा म्हणजेच आपल्या महाराष्ट्रातील घट होय. जसे घट पूजले जातात तसे गुजरातमध्ये गरबा पूजतात. मातीच्या सजविलेल्या मडक्याला काही छिद्रे पाडलेली असतात आणि त्यामध्ये दिवा ठेवला जातो. हा गरबा म्हणजे ब्रम्हांड आणि प्रकाशमान झालेली छिद्रे म्हणजे नभांगणातील तारे होय. दिवा म्हणजेच उर्जेचा स्त्रोत आहे. सारे विश्व एकाच तत्त्वापासून तयार झाले आणि ऊर्जेचे हे तत्त्व साऱ्या सृष्टीत सामावले आहे.

गरब्याचे प्रकार

घूमर - हा सर्वाधिक खेळला जाणारा प्रकार आहे. विशेषतः राजस्थानमध्ये हा लोकप्रिय आहे

भवाई - देवीच्या नावाने दीपक प्रज्वलित केल्यानंतर नृत्य केल्या जाते. याला चमत्कारिक नृत्य असेही संबोधले जाते.

दांडिया रास - अत्यंत वेग आणि चपळाईने खेळला जाणारा हा नृत्यप्रकार आहे. हा प्रकार देशभर प्रसिद्ध आहे.

डिस्को गरबा - बदलत्या काळानुसार उगम पावलेला नृत्य प्रकार म्हणजे डिस्को गरबा. आधुनिक गीतांवर तरुण-तरुणी थिरकत असतात.

गरब्यामुळे शरीराला होणारे फायदे

  • वजन कमी होतेः वेगाने केल्या जाणाऱ्या नृत्यामुळे वजन कमी होते.

  • स्नायू सशक्त होतातः गरबा नृत्यामुळे कंबर, हात, पाय आणि पाठीचे स्नायू मजबूत होतात.

  • रक्तप्रवाह वाढतोः शरीराची सक्रियता वाढून ऊर्जा तयार होते. तसेच रक्तप्रवाह वाढण्यास मदत होते.

  • तणाव दूर होतोः गरबा मानसिक आनंद प्रदान करणार असल्याने तणाव दूर होण्यास मदत होते.

  • स्मरणशक्ती वाढते : हे नृत्य केल्याने मेंदूतील हिप्पोकॅम्पस मेंदूला नियंत्रित करतो आणि स्मरणशक्ती वाढवतो. तसेच फ्रोझन शोल्डरची समस्या दूर होण्यास मदत होते.

  • आत्मविश्वास वाढतोः नृत्याचे सादरीकरण केल्याने आत्मविश्वास, संवाद कौशल्य वाढण्यासोबतच व्यक्ती बहुआयामी होतो.

नृत्य केल्यामुळे माझ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक वेळी मी आनंदी पाहते. नृत्य करताना शरीराच्या प्रत्येक अंगाचा वापर होतो. नृत्य हा योगाचा एक प्रकार आहे, असे म्हटल्यास हरकत नाही. मन शात ठेवण्यास नृत्य उपयोगी आहे.

-अंशुल भोयर, नर्तक

नृत्यामुळे मानसिक आणि भावनिकदृष्ट्या शरीराशी नाते जोडतो. यामुळे, कलावंतांसह प्रेक्षकांना आनंद मिळतो. विदेशाप्रमाणे भारतातही उपचार म्हणून नृत्याचा वापर व्हायला लागला आहे.

- चित्र नायर, नर्तिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections साठी MNSची जय्यत तयारी; मुंबईत पुन्हा राज ठाकरेंची तोफ धडाडणार! 'या' दिवशी होणार सभा

Sultan of Johor Cup साठी भारताच्या ज्युनियर हॉकी संघाचे नेतृत्व अमीरकडे, जाणून घ्या वेळापत्रक आणि संघ

Haryana Assembly: हरियाणात विजय मिळाल्यास, काँग्रेसला 'या' पाच मुद्यांवर 'बूस्टर' मिळणार

Akola Violence: अकोल्यात तणाव! दोन गटात राडा, जमावाने दगडफेक करुन कार पेटवल्या

Singham Again Trailer Launch : "माझी लेक बेबी सिंबा" ; सिंघमच्या ट्रेलर लाँचला रणवीरने केलं लेकीचं कौतुक , बायकोविषयी म्हणाला...

SCROLL FOR NEXT