nagpur sakal
नागपूर

Navratri Festival : तलवारबाजीसह स्त्री शक्तीचा साहसी गरबा; शौर्य, पराक्रम आणि संस्कृतीचे दर्शन; राज्यातील पहिलाच प्रयोग

नवरात्र हे केवळ दांडीया घेऊन नाचण्याचे नव्हे तर उपासनेचे आणि पराक्रमाचेसुद्धा प्रतीक आहे.

केतन पळसकर : सकाळ वृत्तसेवा

नागपूर - गरबा म्हटले की डोळ्यापुढे येतात दांडिया, गुजराती भाषेतील ते पारंपारिक गाणे, घेरदार चणिया-चोली. आता याच गरब्याव्दारे साहस, शौर्य, पराक्रमासह संस्कृतीचे दर्शनही घडून येताना पाहायला मिळत आहे. शक्तीचे प्रतीक असलेल्या महिला लाकडी तलवारी अन्‌ दुर्गेच्या गजरासह पराक्रमाच्या आणि शौर्याचा संदेश उपक्रमातून देऊ पाहत आहे. राज्यामध्ये शिवशक्ती आखाडा आणि शिव परिवार देवस्थानातर्फे पहिल्यांदाच हा उपक्रम होती घेण्यात आला आहे.

तलवारबाजीसह स्त्री शक्तीचा साहसी गरबा

नवरात्र हे केवळ दांडीया घेऊन नाचण्याचे नव्हे तर उपासनेचे आणि पराक्रमाचेसुद्धा प्रतीक आहे. सुरवातीपासून भारतीय संस्कृती ही शस्त्र पुजक संस्कृती आहे. आपल्या प्रत्येक देवी-देवतांचा हाती शस्त्र असतातच.

हीच बाब लक्षात घेत गरब्यातील पायांच्या हालचालीचे जे महत्त्व आहे ते या उपक्रमात जसेच्या तसे आत्मसात करण्यात आले आहे. दांडीयाच्या जागी लाकडी तलवारीचा समावेश झाल्याने केवळ हाताच्या हालचालीत मात्र संरक्षणाच्या दृष्टीने बदल झाला आहे. त्यामुळे, गरबा खेळणारी प्रत्येक महिला या अनोख्या उपक्रमामध्ये काही तासांच्या सरावासह सहभागी होत आहेत.

साहिल दुबे, नितीन पिल्ले यांच्या प्रशिक्षणात शहरातील सहा ठिकाणी तलवार रास गरब्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये, बेलतरोडीतील पाच मंदिरसह दिघोरी, जामदार वाडी इतवारी, नरेंद्रनगर, वैशालीनगर, नंदनवन या ठिकाणांचा समावेश आहे. नवरात्रीमध्ये उपासनेच्या माध्यमातून याच शक्तीच्या जागर झाला पाहिजे,

नव चंडीकेचे काही गुण महिलांनीसुद्धा आत्मसात केले पाहिजे याच प्रामाणिक उद्देशातून या गरबाचे आयोजन शिवशक्ती आखाडा आणि शिव परिवार देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. तलवारीसह ‘स्व’ संरक्षणाचे धडे देणारा राज्यातील हा पहिलाच प्रयोग असावा.

या वर्षी या उपक्रमामध्ये जवळपास तीनशे महिलांनी सहभाग घेतला आहे. २०२५ पर्यंत १० हजार महिला शक्तीला एकत्रित सहभागी करून घेत जागतिक विक्रम करण्याचा मानस आहे.

आपले भारतीय सण काही ना काही महत्त्वा पोटी आणि वैज्ञानिक कारणासह साजरा केले जातात. या मधून आपल्या व्यक्तीगत जीवनात काही ना काही शिकण्यासारखे नक्कीच असते. त्या गोष्टींचे जीवनामध्ये अनुकरण केल्यास जीवन जगणे सोपे होत असून भारतीय सणांचे हेच महत्त्व आहे.

हितेश डफ, आयोजक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raosaheb Danve: महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाची चर्चा अन् रावसाहेब दानवेंची दिल्लीत धावपळ...नेमकं काय सुरू आहे?

Latest Marathi News Updates : नवाब मलिकांंना पराभूत केल्यानंतर 'सपा'चे आमदार अबू आझमी देवगिरीवर अजित पवारांच्या भेटीला

Eknath Shinde: ठाणे जिल्ह्याला हवा फुलटाइम ‘ठाणेदार’; कोणाला मिळणार संधी?

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! 'ट्रॅव्हल्स'च्या दरातच आता चक्क विमानप्रवास; 'या' कंपनीकडून संभाव्य दर प्रसिद्ध

मी पूर्ण प्रयत्न केले, तरी तू जाण्याचा निर्णय घेतलास...! Rishabh Pant ने दिल्लीची साथ सोडल्यानंतर मालक पार्थ जिंदाल स्पष्टच बोलले

SCROLL FOR NEXT