Navratri utsav is festival of women power and strength  
नागपूर

नवरात्री म्हणजे स्त्री शक्तीचा 'आविष्कार' आणि सन्मानाचा 'जागर'; एकीकडे भक्ती तर दुसरीकडे मात्र... 

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : निसर्गाने निर्माण केलेला कलेचा सर्वोत्तम नमुना म्हणजे स्त्री आणि पुरुष !  हे दोन केवळ भिन्न देहच नव्हे तर संपूर्णतः भिन्न प्रकृतीही आहेत. स्त्री ही कोमल तर पुरुष दणकट ! स्त्री सहिष्णू तर पुरुष असहिष्णू ! पुरुषाला मोहाचा शाप तर स्त्रीला संयमाचे वरदान !  परंतु स्त्री ही एका बाबतीत पुरुषाहून वरचढ ठरते आणि ती म्हणजे खंबीरपणा आणि संतुलन !

परिस्थिती कशीही असो स्त्री त्या परिस्थितीला खंबीरपणे तोंड देते.  अतिशय आनंदात किंवा पराकोटीच्या दुःखातही ती आपले मानसिक संतुलन ढळू देत नाही. स्त्री ही प्रसंगी मेणाहून मऊ तर प्रसंगी वज्राहूनही कठोर होऊ शकते. ती मनाने कोमल असली तर विचारांनी कणखर असते. तिच्यात उपजतच शक्तीचा वास असतो. तिच्यातील sixth sense हा सदैव जागृत असतो.

समोरच्या व्यक्तीची पारख करण्याचे उत्तम कसब तिच्यात असते. समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चाललेय हे ओळखणारी ती एक जादूगार असते.  अशा अनेक गुणांनी युक्त असणारी स्त्री मात्र कायमच समाजपुरुषाने दुर्लक्षित केली आहे. अगदी अनादी काळापासून चालत आलेली ही अनिष्ट परंपराच म्हटली पाहिजे ! आणि आजही हे चित्र फारसे बदललेले दिसत नाही. जगाच्या सुरवातीपासून स्त्रीला समाजात दुय्यम स्थान देण्यात आलेय आणि आजही काही सन्माननीय अपवाद वगळता स्थिती काही फारशी उत्साहवर्धक नाही . 

जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात स्त्री पुरुषाच्या बरोबरीने वावरतेय . किंबहुना शिक्षणक्षेत्रात तर मुलीच बाजी मारत असल्याचे आपण गेल्या काही वर्षांपासून पाहतोय ! संरक्षण आणि राजकारणात स्त्रीया आपले योगदान देत आहेत ! तेच क्रीडाक्षेत्राबाबत ! तिथेही मुलीच अग्रेसर आहेत . कलाक्षेत्रात मुशाफिरी करणाऱ्या स्त्रियांचे योगदानही अतिशय महत्वपूर्ण व उल्लेखनीय असेच आहे. असे असूनही मानधानच्या बाबतीत मात्र तिच्याबाबतीत दुजाभाव केला जातो असे दिसून येते. 

आपल्याकडे मात्र या सगळ्या प्रकारावर मखलाशी करण्यात येते . ती अशी की स्त्रीला डायरेक्ट देवीची उपमा देऊन तिचे पूजन केले जाते. अश्याने होते काय की तिचा माणूस म्हणून जगण्याचा हक्कच डावलल्या जातोय! समाजपुरुषाला वाटते की स्त्री ही एकतर देवी असावी नाहीतर गुलाम ! पण तिने माणूस म्हणून जगूच नये ! हे विधान मी मोठ्या धाडसाने करतेय ! कारण सध्या बलात्कार , स्त्रीभ्रूण हत्या आणि घरगुती हिंसेच्या ज्या बातम्या रोजच्या रोज ऐकतोय आणि त्यांचे प्रमाण वाढताना बघतोय , त्याने मी वरील विधान करण्याची हिंमत केलीय !

किती हा विरोधाभास

आजपासून देवीचे नवरात्र सुरू होतेय ! घरोघरी देवीची स्थापना होणार ! तिचे गोडवे गायले जाणार ! तिची स्तोत्रे आरत्या यांनी आसमंत दुमदुमणार ! आणि प्रत्यक्षात मात्र स्त्रीला अपमानाचे कटू घोट प्यावे लागणार ! किती हा विरोधाभास ! ज्या लेकीसुनांना माताभगिनींना आजच्या पुढारलेल्या आधुनिक जगातही पदोपदी अपमान सहन करावे लागतात आणि हिणकस वागणूक सहन करावी लागतेय , त्यांचे काय ? हा विचार जरी मनात आला तरी मनाचा थरकाप उडतो.

स्त्री स्वतः पण कारणीभूत 

कधी विचार करताना असे वाटते की स्त्री ही स्वतःच तर या अवस्थेला कारणीभूत नाही ? आजकाल काही स्त्रिया व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली जे काही वागत आहेत , फॅशनच्या नावाखाली जो काही पेहराव करत आहेत , आपली महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी ज्या थराला जात आहेत , त्याने तर समस्त स्त्री जातीला अपमानास्पद वागणूक दिली जात नाही ना ? त्यामुळे तर तिचे शोषण होत नसेल ना ? तर नाइलाजाने का होईना पण उत्तर हो असेच येते. काही मोजक्या स्त्रीयांमुळे संपूर्ण स्त्रीजातीला हा त्रास सहन करावा लागतोय याचे वाईट वाटते.

स्त्रीला तिच्यातील बलस्थानांची प्रचिती येऊ दे

येत्या नवरात्रापासून स्त्रीने तिच्यात असलेल्या शक्तीला जागवले पाहिजे. त्या अगाध अशा शक्तीचा जगाला आविष्कार दाखवून दिला पाहिजे. संयमी असलेली स्त्री प्रसंगी किती बळकट होऊ शकते याची प्रचिती सगळ्यांना येऊ दे. आणि मुख्य म्हणजे स्त्रीला स्वतःच तिच्यातील बलस्थानांची प्रचिती येऊ दे ! स्त्रीत्वाच्या सीमेत राहूनही ती आकाशाला गवसणी घालू शकते हे तिचे तिलाच समजू दे ! आपले ध्येय साध्य करण्यासाठी तिला कोणत्याही नीच थराला जावे लागत नाही , आपली बुद्धीमत्ताच आपली सर्वात मोठी शक्ती आहे , हे स्त्रीला समजू दे ! हेच त्या जगत् जननी शक्तीदेवतेला साकडे घालते !

या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेण संस्थिता  | नमस्तसै नमस्तसै नमस्तसै नमो नमः |||

लेखिका - यशःश्री तापस

संपादन - अथर्व महांकाळ 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK ची साथ सुटताच Deepak Chahar च्या बहीण अन् पत्नीची स्पेशल सोशल मीडिया पोस्ट; पाहा काय लिहिलंय

Mumbai Local Train: मुंबईमध्ये उद्यापासून १३ नवीन AC लोकल धावणार; गाड्यांची संख्या ९६ वरुन १०६

FIDE World Championship: भारताच्या डी गुकेशचं पराभवानंतर दुसऱ्या फेरीत कमबॅक, लढत ड्रॉ राखण्यात यश

Manoj Jarange Patil: ''एकदा सरकार स्थापन होऊ द्या.. तुम्ही तयारीला लागा'' मनोज जरांगे यांचं मराठा समाजाला आवाहन

ZIM vs PAK: १४६ धावांचे लक्ष्य एकट्याने चोपल्या ११३ धावा! २२ वर्षीय पाकिस्तानी फलंदाजाची हवा

SCROLL FOR NEXT