NCP congress disqualification case Sakal
नागपूर

पक्ष व चिन्ह गेल्यास कसे लढायचे ? शरद पवारांचे समर्थक चिंतेत, शिवसेनेचेच निकष राष्ट्रवादीला लागण्याची शक्यता

How to fight if party and sign go? Sharad Pawar's supporters are worried! ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत पक्ष गमावण्याचा धोका असल्याने आगामी निवडणूक कुठल्या चिन्हावर लढायची याची चिंता शरद पवार यांच्या गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व समर्थकांना सतावू लागली आहे.

सकाळ डिजिटल टीम

NCP Party Symbol ECI: ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत पक्ष गमावण्याचा धोका असल्याने आगामी निवडणूक कुठल्या चिन्हावर लढायची याची चिंता शरद पवार यांच्या गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व समर्थकांना सतावू लागली आहे. यामुळे महाविकास आघाडीच्या जागा वाटपावरही याचा परिणाम होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.


शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ घरोघरी पोहचवले आहे. त्या बळावर तब्बल पंधरा वर्षे सलग आघाडीचे सरकार महाराष्ट्रात होते. मात्र आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा अवस्था झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात तब्बल ४० आमदार महायुतीसोबत सत्तेत सहभागी झाले आहेत. (NCP disqualification case)

आमदार व खासदांच्या संख्येनुसार निवडणूक आयोग आणि विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी शिवसेना आणि धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हवाली केला. हाच न्याय व निकष राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची याचा न्याय निवाडा करताना लावण्यात येणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. (Latest Marathi News)


पोटनिवडणुकीच्या निमित्ताने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने मशाल हाती घेतली होती. तेव्हापासून मशाल घेऊन शिवसैनिक फिरत आहे. आता लोकसभेची निवडणूक केव्हाही जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अयोध्येतील राम मंदिराचे उद्‍घाटन होताच निवडणूक आयोगाने मतदार याद्या जाहीर करणे सुरू केले आहे. त्यानुसार १५ फेब्रुवारीपर्यंत निवडणूक जाहीर केल्या जातील असा अंदाज वर्तविली जात आहे. या दरम्यान राष्ट्रवादीचा निकाल अजित पवार यांच्या गटाचे बाजूने लागल्याचे शरद पवार यांना नवा पक्ष व नवे चिन्ह घेऊन निवडणुकीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. याचा फटका निवडणूक बसण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

सध्या राज्यातील महाविकास आघाडीत सध्या जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. ज्याचा जिथे प्रभाव त्यांचा तिथे उमेदवार असे धोरण ठरवण्यात आले आहे. त्यानुसार शरद पवार यांच्या गटाला प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातील आठ ते दहा जागा देण्यात येणार आहे. मात्र पक्ष आणि चिन्हच नसेल तर काही जागा शरद पवार गटाला सोडाव्या लागतील. शरद पवार यांचा स्वभाव लक्षात घेता ते सहजासहजी हार मानतील असे दिसत नाही. याचा अंदाज आला असल्याने त्यांनी पर्यायी व्यवस्था करून ठेवली असल्याचेही सांगण्यात येते.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Hitendra Thakur: तावडे पैसे देताना कुणाला घावले? २५ फोन, ५ कोटी अन् सर्व प्रकरण बाहेर काढणारे हितेंद्र ठाकूर कोण?

Vinod Tawde VIDEO: विनोद तावडेंना बविआ कार्यकर्त्यांनी हाॅटेलमध्ये घेरलं, पैसे वाटल्याचा आरोप करत घातला राडा, काय घडलं नेमकं?

Nanded South Assembly constituency : नांदेड-दक्षिण मतदारसंघात विजयश्री कोणाला घालणार माळ, नवीन चेहऱ्याचा ट्रेंड कायम राहणार का?

Flipkart Mobiles Bonanza Sale : महागड्या मोबाईलवर मिळतोय बंपर डिस्काउंट; सुरू झाला फ्लिपकार्टचा Bonanza सेल, ऑफर्स पाहा

Satara Assembly Election 2024 : तुमच्यामुळेच संस्था अडचणीत; पसरणीत अरुणादेवी पिसाळ यांची टीका

SCROLL FOR NEXT