Nagpur News : देशातील पुढारलेल्या राज्यात समाविष्ट असलेला महाराष्ट्र आर्थिक गुन्ह्यांत देशात दुसऱ्या क्रमांकावर असल्याची धक्कादायक माहिती नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरोच्या आकडेवारीत समोर आली आहे.
राज्यात १४ हजार ९३४ कोटी रुपयांचे आर्थिक गुन्हे दाखल करण्यात आले असून प्रथम क्रमांकावर असलेल्या तेलंगनात ही आकडेवारी १६ हजार ६९४ कोटींवर आहे. विशेष म्हणजे राज्यात नागपूर आर्थिक गुन्ह्यांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये आर्थिक गुन्ह्यांमध्ये देशभरात वाढ झाली आहे. त्यानुसार आर्थिक गुन्ह्याखाली एकूण ४० हजार ७६० प्रकरणे नोंदविली गेली. ही वाढ २०२१ च्या तुलनेत १५.८ टक्क्याने अधिक असून २०२१ मध्ये ३५ हजार १८५ प्रकरणांची नोंद करण्यात आली होती.
यामध्ये राज्यांचा विचार केल्यास तेलंगना राज्यात २०२२ मध्ये १६ हजार ६९६ आर्थिक गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. याशिवाय राज्यात १४ हजार ९३४ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. यातून २ हजार २८ कोटींची लूट करण्यात आल्याचे आकडेवारी सांगते.
विशेष म्हणजे, सर्वसामान्यांना त्याचा अधिक फटका बसला असून एक लाखापेक्षा कमी पैसे जाणाऱ्यांमध्ये ६७७ जणांचा समावेश आहे. ५० ते शंभर कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आलेल्यांमध्ये १५ जण तर १०० कोटी रुपयांच्या वर पाच जणांची फसवणूक करण्यात आली आहे.
एक लाखापेक्षा कमी - ६६५३
एक ते दहा लाख -५२०६
दहा ते ५० लाख - २०२९
५० लाख ते १ कोटी -५०६
एक ते १० कोटी -४५७
१० ते २५ कोटी -४७
२५ ते ५० कोटी - १६
५० ते १०० कोटी - १५
१०० कोटीच्या वर - ५
एकूण - १४, हजार ९३४
तेलंगणा - १६ हजार ६९६
एक लाख ते १०० कोटींपेक्षा अधिक रकमेतील गुन्हे
मुंबई - ५२६७
नागपूर - ५४४
पुणे - ६५७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.