नागपूर

Nagpur Corona Update: गेल्या २४ तासांत तब्बल ८५ मृत्यू; नवे ७ हजार १०७ बाधित

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : कोरोना विषाणूच्या दहशतीने आरोग्य क्षेत्र पुरते हादरून गेले आहे. कोरोनाच्या विळख्यात अडकणाऱ्यांचा आकडा दर दिवसाला फुगत आहे. गतीने होत फैलावाने प्रशासनाची चिंता वाढवली असून कोरोनाच्या मृत्यूच्या प्रलयाचे संकट आले आहे. कोरोनाबाधित मृत्यूच्या दरात अचानक वाढ झाली असून रविवरी (ता.१८) एकाच दिवशी ८५ जणांचा बळी कोरोनाने घेतला आहे. तर २४तासांमध्ये ७ हजार १०७ जण कोरोनाबाधित आढळले आहेत. गृहविलगीकरणात असलेल्यांची संख्या ५३ हजार ९९६ वर पोहचली आहे.

कोरोनाचा विळखा दिवसगणिक वाढत आहे. त्यामुळे एकीकडे सरकारी कोविड सेंटर्समधील खाटा अपुऱ्या पडत आहेत. जे कोरोनाबाधित रुग्ण आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत, त्यांनादेखील खासगीत खाट मिळत नाही. कोरोनाने जनतेची अशी विचित्र कोंडी केली आहे. कोरोनावर निंयत्रण येण्यापेक्षा अधिक गतीने वाढत आहे.

दर दिवसाला एक नवा विक्रम कोरोनाच्या नावावर तयार होत आहे. २४ तासांत ७ हजार १०४ बाधित आढळल्यामुळे आतापंर्यंतच्या बाधितांची संख्या ३ लाख २३ हजार १०६ झाली आहे. यात शहरातील २ लाख ४० हजार २५८ तर ग्रामीण भागातील ८१ हजार ७११ बाधितांचा समावेश आहे. जिल्हयात आज झालेल्या ८५ मृत्यूमध्ये शहरातील ४५ कोरोनाबाधितांचा समावेश आहे. तर ग्रामीण भागातील ३३ जण दगावले आहेत. यामुळे आतापर्यंत ६ हजार २७३ कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद नागपूर जिल्ह्यात झाली आहे.

यात शहरातील ३ हजार ८७३ कोरोना मृत्यूचा तर ग्रामीण भागातील १ हजार ४४५ जणांचा समावशे आहे. विविध भागातून रेफर करण्यात आलेल्या सुमारे ९५५ जणांचा देखील मृत्यू नागपुरात झाला आहे. नागपुर जिल्ह्याता १३ हजार ८९५ आरटी पीसीआर तर १२ हजार ८९७ रॅपिड ॲन्टिजेन चाचण्या झाल्या आहेत. यामुळे रविवारी जिल्ह्यात २६ हजार चाचण्या झाल्या आहेत. आतापर्यंत चाचण्याची संख्या १९ लाख ९६ हजार८५४ झाली आहे.

सक्रिय कोरोनाबाधित वाढले

सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या प्रचंड गतीने वाढत आहे. जिल्ह्यात ६९ हजार सक्रिय कोरोनाबाधित आहेत.यात शहरातील ४१ हजार ७७९ तर ग्रामीण भागातील २७ हजार ४६४ बाधित आहेत. जिल्ह्यात रविवारी ३ हार ९८७ जणांनी कोरोनावर मात केली आहे.यामुळे आतापर्यंत कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या २ लाख ४७ हजार झाली आहे. यात शहरातील कोरोनामुक्तांची संख्या १ लाख ९४ हजार३१२ तर ग्रामीण भागातील ५३ हजार २७८ जणांचा समावेश आहे.

संपादन - अथर्व महांकाळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर....

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार कोण आघाडीवर?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचा हा विजय

Maharashtra Election 2024: जरांगे फॅक्टर फेल! महाराष्ट्रात महायुतीनं मारली मुसंडी, भाजप रेकॉर्डब्रेक आघाडी

SCROLL FOR NEXT