नागपूर : बलात्कार केल्याची तक्रार केल्यामुळे गुन्हा दाखल झालेल्या युवकाने महिलेच्या कारची तोडफोड केली. कारमध्ये ठार मारण्याची धमकी असलेली चिठ्ठी फेकली. ही घटना नंदनवन परिसरात उघडकीस आली. या घटनेने पीडित व नातेवाइकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. तसेच नंदनवन पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ३१ वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद केली आहे. (News-of-atrocities-Crime-news-Nagpur-Crime-news-nad86)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ वर्षीय महिलेने पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर दुसरे लग्न केले होते. ती दुसऱ्या पतीसह नंदनवन परिसरात राहाते. ती मोबाईल शॉपीचा संचालक अनुप याला ओळखते. तिने त्याच्या दुकानातून मोबाईल दुरुस्त केला होता. त्याच्याशी ओळख झाल्यानंतर तिची मैत्री झाली होती. १२ जूनला अनुप हा महिलेच्या घरी गेला. त्यावेळी तिची पती बाहेरगावी गेला होता. त्याने घराच्या दारावर रमेश नावाचा मित्र पहारेदार म्हणून ठेवला होता.
घरी एकट्या असलेल्या महिलेला त्याने शारीरिक संबंधाची मागणी केली होती. तिने नकार दिल्यामुळे बळजबरी बलात्कार केला. यानंतर पती बाहेरगावी गेल्याची संधी साधून अनुप वारंवार तिच्या घरी येऊन लैंगिक शोषण करायला लागला होता. यावेळी रमेश याने अनुप याला मदत केली. अनुपने बदनामी केल्यामुळे तिने संबंध ठेवण्यास नकार दिला होता. त्याने तिला मारहाण करीत संबंध ठेवण्यास बाध्य केले होते. त्यामुळे महिलेने नंदनवन पोलिसांत तक्रार दिली.
पोलिसांनी बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली नाही. नंदनवन पोलिसांनी आरोपींशी ‘अर्थपूर्ण’ संबंध ठेवल्याची चर्चा आहे. दरम्यान अनुप याने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला. गुरुवारी पहाटे महिलेच्या कारची काच फोडून त्यात धमकीची चिठ्ठी फेकण्यात आली.
पोलिसांत केलेली ‘तक्रार परत घे, अन्यथा तुझ्या शरीराचे चार तुकडे करून चार राज्यात फेकून देईल. तुझ्या कुटुंबीयांनाही सोडणार नाही,’ असे चिठ्ठीत लिहिले आहे. सकाळी तरुणीला ही धमकीची चिठ्ठी दिसली. तिने नंदनवन पोलिसांना माहिती दिली. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.
(News-of-atrocities-Crime-news-Nagpur-Crime-news-nad86)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.