Nagpur News : देशाला पेट्रोल-डिझेलमुक्त करण्याचे आपले ध्येय आहे. डिफेन्सच्या लाभाकरिता आऊटर रिंगरोडवर लवकरच नवीन तंत्रज्ञानाने युक्त १३२ आसनक्षमता असलेली ट्रॉली बस सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. विदर्भ डिफेन्स इंडस्ट्रीज असोसिएशन, महिंद्रा ट्रॅक्टर्स, यंत्र इंडिया लिमिटेड यांनी संयुक्तपणे स्थापन केलेल्या वेदिक-महिंद्रा कौशल्य विकास केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
ऑर्डिनन्स फॅक्टरी अंबाझरी परिसरातील जिल्हा परिषदेच्या शाळेत अद्ययावत सुविधांनी युक्त केंद्राचीही गडकरी यांनी पाहणी केली. विदर्भ डिफेन्स इंडस्ट्रिज असोसिएशन, महिंद्रा ट्रॅक्टर्स, यंत्र इंडिया लिमिटेड यांच्या प्रयत्नांनी आणि राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (एनएसडीसी) च्या पाठिंब्याने हा प्रकल्प साकार झाला आहे.
यावेळी अलायन्स ऑफ इंडियन एमएसएमई (एआयएम) चे संस्थापक अध्यक्ष आणि भारत सरकारच्या एमएसएमईचे माजी सचिव दिनेश राय, एनएसडीसी नवी दिल्लीच्या उपाध्यक्ष डॉ. अर्चना पाटणकर, महिंद्रा ट्रॅक्टर्स, एम अँड एम लिमिटेडचे मॅन्युफॅक्चरिंगचे सीनियर उपाध्यक्ष नचिकेत कोडकणी,
यंत्र इंडिया लिमिटेडचे कार्यकारी संचालक अंजनकुमार मिश्रा, व्हीडीआयएचे अध्यक्ष मेजर जनरल अनिल बाम, वेदिकचे अध्यक्ष दिलीप गोंडनाळे, व्हीआयडीए-वेदिकचे संयोजन दुष्यंत देशपांडे, एनएसडिसी कन्सल्टन्ट डॉ. कपिल चांद्रायण आदींची प्रमुख उपस्थिती होती.
गडकरी म्हणाले, ‘आपल्या भागात ज्या मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे, त्यानुसार कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याची गरज आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होईल.
आपल्या प्रदेशाची गरज लक्षात घेऊन भविष्यात कोणते तंत्रज्ञान आपल्यासाठी उपयुक्त आहे, याचा विचार करा आणि त्यानुसार तरुणांमध्ये नवतंत्रज्ञानाचे कौशल्य विकसित करा, असे आवाहनही गडकरी यांनी औद्योगिक कंपन्यांना केले. संचालन योगिता कस्तुरे यांनी तर आभार दुष्यंत देशपांडे यांनी मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.