Delta Variant Google file photo
नागपूर

डेल्टा प्लसचे रुग्ण ठेवायचे कुठे? संशयितांचे नमुने NIVमध्ये

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : डेल्टा प्लस विषाणूंची (delta plus corona variant) लागण झालेल्या रुग्णांना ठेवायचे कुठे? असा मोठा प्रश्न आता उभा ठाकला आहे. कारण डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण आढळल्यास त्यांच्यावरील उपचाराची दिशा काय असेल, यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे अद्याप आली नाही, अशी जोरदार चर्चा मेडिकल वर्तुळात सुरू आहे. दरम्यान जिल्ह्यातील आठ डेल्टा प्लस संशयितांचे नमुने तपासणीसाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडे (NIV Pune) पाठवण्यात आले. (no guidelines for delta plus corona patients in nagpur)

उमरेड तालुक्यातील आठ कोरोनाबाधितांचे संशयित डेल्टा प्लस तपासणीसाठी नमुने नीरीत तपासणीला आले. त्यात पुन्हा शहरातील चार जणांची भर पडली. डेल्टा प्लस रुग्ण आढळल्यानंतर त्याला कोरोनाच्या वार्डात ठेवायचे की, इतरत्र कुठे ठेवायचे तसेच त्या रुग्णावर उपचाराची पद्धत काय असेल यासंदर्भात मेडिकल- मेयोत तज्ज्ञ डॉक्टरांमध्ये साधी चर्चा देखील झाली नाही. अशा चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, दोन्ही रुग्णालयांकडून मात्र तेथे डेल्टा रुग्ण हाताळण्याची सोय असल्याचा दावा केला गेला आहे.

दुसऱ्या लाटेत बदललेले रुप -

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने नागपुरात थैमान घातले होते. या लाटेने मृत्यूचे तांडव नागपूरने अनुभवले. या कोरोना लाटेत पाच ते सहा प्रकारचे कोरोनाचे नवीन बदललेले स्वरूप आढळल्याची नोंद आहे. त्यामुळे हे रुग्ण आढळण्यापूर्वी येथील तज्ज्ञ डॉक्टर या रुग्णांना हाताळणीबाबत नियम निश्चितीची गरज असल्याचे वैद्यक तज्ज्ञ सांगतात. या विषयावर मेडिकल, मेयोतील डॉक्टरांनी नाव न टाकण्याच्या अटीवर कोरोनाचा डेल्टा प्लस हा प्रकार असला तरी त्याच्या उपचाराची पद्धत एकच असल्याचे सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DY Chandrachud: "कुणाला दुखावलं असेल तर मला माफ करा", निरोप समारंभात सरन्यायाधीश झाले भावूक

Ranji Trophy 2024-25: मुंबईची मोठ्या आघाडीमुळे विजयाकडे वाटचाल, तर दुसरीकडे ३३९ धावांचा पाठलाग करताना महाराष्ट्राची खराब सुरूवात

Fact Check : मुस्लिम नेत्याला उपमुख्यमंत्री करा! 'मविआ'कडे संघटनांनी अट ठेवल्याचा 'तो' दावा खोटा

Mrinal Kulkarni : आईचं निधन.. पण शो मस्ट गो ऑन, मृणाल कुलकर्णी काही दिवसांतच कामावर रुजू

Maharashtra Assembly Election Candidate List: राज्यातील 288 मतदारसंघातील लढती, कुठे कोण आहेत उमेदवार, कुठे होणार तगडी फाईट?

SCROLL FOR NEXT