No teachers are in Tribal schools in Parshivani Nagpur district  
नागपूर

काय सांगता! आदिवासी आश्रमशाळेतील शिक्षक झाले गायब; कोलितमारा येथील विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात

रुपेश खंडारे

पारशिवनी (जि. नागपूर) : आदिवासी भागात शिक्षणाची सोय व्हावी आणि त्यांना समाजप्रवाहात आणावे, म्हणून शासनाने आदिवासी प्रकल्प कार्यालयांतर्गत कोलीतमारा येथे आदिवासी विद्यार्थ्यांकरीता निवासी आदिवासी आश्रमशाळा सुरू केली. परंतु आज शाळेची दयनीय अवस्था आहे . शाळेत विद्यार्थी येतात, परंतु त्यांना शिकवायला शिक्षकच उपस्थित नसतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात आहे. शाळेत अनेक शिक्षक प्रतिनियुक्तीवर नागपूर येथील प्रकल्प कार्यांलय व इतर जिल्ह्यात डेप्यूटेशनवर गेले असल्यामुळे ही शाळा शिक्षकविनाच सुरु असल्याचे आढळून आले. मुख्य प्रकल्प अधिकारी मात्र डोळे मिटून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत असल्याचे वास्तव चित्र आहे. 

कोट्यवधी रुपये खर्च करून कोलितमारा येथे शासकीय आश्रमशाळा बांधण्यात आली. आज या शाळेत एक ते दहा वर्गात ९५ विद्यार्थ्यांची नोंद आहे. ३० जानेवारीला शाळेत प्रत्यक्ष भेट दिली असता भोंगळ कारभार उघडकीस आला. पाचवी ते दहावीचे विद्यार्थी उपस्थित होते, याची हजरी बुकवर नोंद होती. परंतु त्यांना शिकवायला एकही शिक्षक उपस्थित नव्हता.अनेकदा शाळेतील शिक्षक गैरहजर असतात, असे ग्रामस्थ सांगतात. काही शिक्षक तर शुक्रवारी गावाला जातात व थेट सोमवार किंवा मंगळवारी शाळेत येतात, अशी चर्चा आहे. 

शिक्षकांची अनेक पदे रिक्त 

या शाळेत माध्यमिक वर्गाकरिता इंग्रजी, विज्ञान व गणित हे विषय शिकविण्याकरिता शिक्षकच उपलब्ध नाहीत. मुख्याध्यापकाचे पद गेल्या तीन वर्षांपासून रिक्त आहे. शिक्षकाकडे मुख्याध्यापकाचा कारभार दिल्याने त्यांना वारंवार नागपूर येथील मुख्यालयात जावे लागत असल्याने विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान कसे उपलबध होईल, हा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. माध्यमिकला पाच पदे हवीत. परंतु तिथे दोनच शिक्षक आहेत, तर प्राथमिकला आठपैकी दोन शिक्षक नियुक्त आहे. या वसतिगृहात २१ विद्यार्थी निवासी असल्याची नोद आहे. मात्र शाळा सुरु असताना अद्याप एकही विद्यार्थी वस्तिगृहात निवासाला नाही. महिला अधीक्षक अद्याप रुजू झाल्या नाहीत. 

टेंडरच नाही, खाऊ काय घालणार ? 

शासनाने कोविड १९ नंतर शाळा सुरू करण्याचे आदेश शाळांना दिले आहेत. त्यानुसार आदिवासी आश्रमशाळा सुरू झाल्या. परंतु आद्यपदेखील येथील अन्नपुरवठ्याचे कंत्राट झाले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना भोजन व अल्पोहार काय खाऊ घालायचा, असा प्रश्न निर्माण होतो. शाळा सुरु होणार या आधीच सर्व टेंडर कार्य होणे, अपेक्षित असताना मात्र अद्याप टेंडर झाले नाही. 

आमच्या शाळेतील बहुतांश कर्मचारी डेप्युटेशनवर प्रकल्प अधिकारी कार्यालयात आहेत. शाळेत शिक्षक पूर्ववत यावे व शाळा सुचारू रुपाने सुरु व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विद्यार्थ्यांचे हित नेहमी जोपासले जाते. शिक्षकांची मागणी केली असून लवकरच शिक्षक उपलब्ध होतील. 
राजेंद्र बोचर 
प्रभारी मुख्याध्यापक 
आश्रम शाळा कोलितमारा 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Javle Won Raver Assembly Election 2024 Result Live: रावेर विधानसभा मतदार संघातून अमोल जावळे विजयी

Vaijapur Assembly Election 2024 Result Live: वैजापुरात शिवसेना विरुद्ध शिवसेना लढतीत रमेश बोरनारे यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Gangapur Assembly Election 2024 Result Live: भाजपचे प्रशांत बंब विजयी, सतिश चव्हाणांवर केली मात

Tanaji Sawant won Paranda Assembly Election 2024 : परांडा मतदारसंघात तिरंगी लढाईत तानाजी सावंत तानाजी सावंत यांनी मारली बाजी

SCROLL FOR NEXT