काटोल (जि.नागपूर) : "डाकीया डाक लाया...' हे हिंदी सिनमाचे गाणे मित्रहो, आता खूप जुने झाले. या संकटाच्या काळात "सच्चा मित्र' मानला जाणारा डाक विभाग आता लॉकडाउन सुरू असताना जनसामान्यांसाठी धावून येत आहे बरं का! डाक विभागाच्या वतीने कोरोना संकटाचा सामना करण्याकरिता ग्रामीण भागात खास शेतकऱ्यांकरिता लॉकडाउनमध्ये शेती उत्पादनाची वाहतूक समस्या सोडविण्याकरिता डाक विभाग पुढे सरसावला. या योजनेचा शुभारंभ नागपूर येथील इतवारी पोस्ट कार्यालय येथे झाला. काटोल येथे जाणारा पहिला "किसान रथ' आज काटोल येथे आला. यामुळे शेतीसाहित्य वाहतुकीची समस्या सुटणार आहे. योजनेचे भारतीय राज्य किसान संघटनेचे पदाधिकारी नाना आखरे यांनी रथाचे स्वागत केले.
"अहर्निशम सेवामहे'
भारतीय डाक विभागाने पारंपरिक केवळ पत्रव्यवहार, मनी ऑर्डर, याशिवाय काळानुसार नवीन पाऊल उचलले आहे. "अहर्निशम सेवामहे' आणि "स्वयंसेवा करण्यापूर्वी जन सेवा' या उद्दिष्टाने भारतीय डाक विभाग यशस्वी वाटचाल करीत असल्याचे सुप्रिडेंट ऑफ पोस्ट विभाग, नागपूर ग्रामीणचे ताव शर्मा यांनी सांगितले. ग्रामीण भागातील व विशेषतः शेतकऱ्यांकरिता लॉकडाउन अडचणीत वेळेवर, नियोजित
ठिकाणी रास्त दरात पोहोचवणारी योजना फार लाभदायक व सोयीची ठरणार आहे. योजना नवी असल्याने ग्रामीण लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.
रथाला उत्तम प्रतिसाद
शेतकऱ्यांचे व बी-बियाणे, अन्नधान्य, शेतकी इतर साहित्य लॉकडाउन काळात वाहतुकीला फार उपयुक्त ठरली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात वाहतुकीला उत्तम प्रतिसाद मिळणार आहे.
किसान रथ योजना शुभारंभ
मेसर्स "जय किसन' कॉटन मार्केट, नागपूरने कळमेश्वर, काटोल, पारडसिंगा, भारसिंगी, जलालखेडा आदी भागात पहिल्याच वेळेत सेवा दिली आहे. काटोल येथे माल उतरविल्यानंतर वरुडसाठी सुद्धा बी-बियाणे आदी बॅग भरल्या गेल्या. परतीच्या प्रवासासाठी आमनेर व काटोल येथून नागपूरला 13 बॅग पाठविण्यात आल्या. वाहतुकीचा अंदाज घेता " किसान रथ' योजना सोयीची, लाभदायक ठरणार असल्याचे मत दत्त कृषी केंद्र संचालक प्रवीण लोहे यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांचे कमी साहित्य खासगी वाहन करणे, वाहतूक समस्या, धावपळ आदीतून आता मुक्ती मिळणार आहे. सामान्य गुड्स गॅरेंजपेक्षा अल्प खर्चात, योग्य वेळेत शासनाची खात्रीपूर्वक सेवा मिळणार असल्याचे विश्वव्यापी संस्था काटोल अध्यक्ष आकाश बेहनिया यांनी सांगितले.
हिरवी झेंडी दाखविली
गोवा, महाराष्ट्रात औरंगाबाद, पुणे, मुंबई व नागपूर विभागात डाक विभागातर्फे ही योजना राबविली जात असून नागपूर किसन रथ योजनेचा शुभारंभ डाक विभाग प्रवर अधीक्षक ताव शर्मा यांच्या हस्ते हिरवी झेंडी देऊन करण्यात आला. यावेळी डाक विभाग अधिकारी रामचंद्र जायभाये, डाक निर्देशक पवन दालमिया, अति.प्रवर अधीक्षक दिलीप खाडे, एएसपी पौनी, जयंत डाऊ, शिवम शंकर, व्ही. पी. भोगे, सागर अमाले, मोरेश्वर सांब्रे, नाथुजी वानखेडे, देवानंद गायकी आदींची उपस्थिती होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.