नव्या ‘सलाईन गार्गल-आरटीपीसीआर' चाचणी करताना नागरिक 
नागपूर

खारट पाण्याच्या गुळणीवरून कोरोना चाचणी; तीन तासांत मिळणार अहवाल

राजेश प्रायकर

नागपूर : नाक तसेच घश्याचे स्वॅब घेताना नागरिकांना (new type of corona swab) मोठा त्रास सहन करावा लागतो. आता मात्र या त्रासापासून त्यांची सुटका होणार आहे. ‘नीरी’चे (Neeri's research) शास्त्रज्ञ डॉ. कृष्णा खैरनार (Dr. Krishna Khairnar) यांनी नव्या पद्धतीचे संशोधन केले असून, खारट पाण्याच्या गुळणीवरून कोरोना चाचणी (Corona test from salt water sieve) करण्यास शनिवारी सुरुवात झाली. याशिवाय या चाचणीचा अहवाल केवळ तीन तासांत येणार असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. (Now test the corona from the saline solution)

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर)अंतर्गत ‘नीरी’ने कोरोना चाचणीसाठी नवी पद्धत शोधून काढली. या पद्धतीला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (आयसीएमआर) परवानगी मिळाली. ‘सलाईन गार्गल आरटी-पीसीआर’ अशा या नव्या पद्धतीचे नाव असून रुग्णांना खारट पाण्याची गुळणी करून सामान्य ‘कलेक्शन ट्यूब’मध्ये जमा केली जाते. हा नमुना ‘नीरी’च्या लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवला जाणार आहे.

एका विशिष्ट तापमानात ‘नीरी’कडून तयार करण्यात आलेल्या विशिष्ट सोल्युशनमध्ये हा नमुना ठेवला जातो. त्यानंतर तीन तासांत अहवाल प्राप्त होतो. ‘नीरी’चे पर्यावरण विषाणू कक्षाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. कृष्णा खैरनार यांनी या नव्या चाचणीचे संशोधन केले आहे. या चाचणीला शनिवारी शहरातील लक्ष्मीनगरातील जेरील लॉन जवळील आरपीटीएस येथे सुरुवात झाले. या पद्धतीने नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. आयुक्त राधाकृष्णन बी. यांनीही या केंद्रावर भेट दिली. त्यांनी डॉ. खैरनार यांचे अभिनंदन केले.

अशी आहे प्रक्रिया

नीरीने तयार केलेले सोल्युशन गरम केले जाते. त्यातून एक ‘आरएनए’ टेम्प्लेट तयार होते. त्यानंतर या सोल्युशनवर ‘आरटी-पीसीआर’ प्रक्रिया केली जाते. चाचणीच्या या नव्या पद्धतीत नमुने गोळा करणे आणि त्यावर प्रक्रिया करणे खूप स्वस्त पडते. नाकातून स्वॅब घेण्यासाठी अधिक वेळ लागतो आणि या पद्धतीमध्ये नागरिकांनाही त्रास सहन करावा लागतो, ते टाळता येईल, असे डॉ. कृष्णा खैरनार यांनी सांगितले.

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, गडकरींनी केले कौतुक

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ‘नीरी’चे शास्त्रज्ञ डॉ. कृष्णा खैरनार व चमूचे अभिनंदन केले. महापौर दयाशंकर तिवारी यांनीही डॉ. खैरनार यांचे अभिनंदन केले. नागपूर शहरासाठी ही अभिमानास्पद बाब असून ‘नीरी’च्या कामगिरीमुळे जागतिक स्तरावर येथील वैज्ञानिकांनी कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविला, असे महापौर दयाशंकर तिवार म्हणाले.

(Now test the corona from the saline solution)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT