नागपूर : शेजारी राहणाऱ्या दोन मुलींना चॉकलेट (toffee) देऊन घरात खेळायला बोलावले. दोघीपैकी एका मुलीवर त्याने बलात्कार (Rape) केला. ही संतापजनक घटना शनिवारी दुपारी कळमना परिसरात घडली. नराधम वृद्धाला पोलिसांनी ताबडतोब अटक केली. डोलचंद चव्हाण (वय ५९) असे अटकेतील आरोपी वृद्धाचे नाव आहे. (Old man atrocity 13 year-old girl Nagpur crime news)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोलचंद चव्हाण हा मजूर असून विवाहित आहे. मुलगी सातव्या तर तिची मैत्रीण सहाव्या वर्गात शिकते. मुलीचे आई-वडील मोलमजुरी करतात. शनिवारी तिचे आई-वडील कामावर निघून गेले. दुपारी दोन वाजताच्या सुमारात मुलगी मैत्रिणीसोबत खेळत होती. डोलचंद याने दोघींना प्रथमतः चॉकलेट दिले. बाहेर उन्हात न खेळता घरात येऊन ‘आंधळी कोशिंबिर’ खेळण्याच्या बहाण्याने घरात बोलाविले.
त्याने दोघींच्या डोळ्यावर पट्टी बांधली. त्यानंतर १३ वर्षीय मुलीला बेडरूममध्ये नेले तर दुसरीला बाहेर थांबण्यास सांगितले. त्याने मुलीवर लैंगिक अत्याचार केला. मुलीने आरडा-ओरड केल्याने लगेच शेजारी धावले. मुलगी रडत होती. तिने घडलेला प्रकार शेजाऱ्यांना सांगितला. प्रकार लक्षात येताच नागरिक संतापले. त्यांनी चव्हाण याला पकडून ठेवले.
घटनेची माहिती मिळताच कळमन्याचे ठाणेदार विश्वनाथ चव्हाण हे पोलिसांचा ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी नागरिकांच्या तावडीतून चव्हाण याची सुटका करीत ताब्यात घेतले. परिस्थितीवर नियंत्रण मिळविल्यानंतर पोलिसांनी अत्याचारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून चव्हाण याला अटक केली.
नागरिकांनी केली धुलाई
मुलीचा आरडाओरडा ऐकूण शेजाऱ्यांनी डोलचंदच्या घराकडे धाव घेतली. त्यांना रडत असलेली अर्धनग्न मुलगी दिसताच प्रकार लक्षात आला. नागरिकांनी डोलचंदला चांगला चोप दिला. त्याने माफी मागून सोडून देण्याची विनंती केली. नागरिकांनी वेळीच दाखवलेल्या सतर्कतेमुळे दुसऱ्या मुलीची इभ्रत वाचली, अशी चर्चा होती.
(Old man atrocity 13 year-old girl Nagpur crime news)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.