आत्महत्या Google
नागपूर

आजारपणाला कंटाळून महिलेने चिरला स्वतःचा गळा

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : एका वृद्ध महिलेने स्वतःचा गळा चाकूने कापून आत्महत्या (nagpur crime) केली. ही खळबळजनक घटना मंगळवारी दाभा परिसरात (dabha nagpur) उघडकीस आली. मोहर मुन्नी सिंह (वय ७०, रा. अशोक एन्क्लेव्ह, दाभा) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहर मुन्नी सिंह या मुलगा, सून व सहा वर्षांच्या नातीसह राहते. मुलगा वाहतूक व्यावसायिक असून व्यवसायानिमित्त बाहेरगावी गेला आहे. त्यामुळे घरात सून व सहा वर्षांची मुलगी होती. मंगळवारी सकाळी सून झोपेतून उठली असता स्वयंपाक घराच्या बाजूला असलेल्या वॉश बेसीनजवळ सासू रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. सुनेने ताबडतोब पतीला फोन करून माहिती दिली. पतीने शेजारच्यांना कॉल करून मदत करण्याची विनंती केली. शेजाऱ्यांनी सकाळी ७.३० वाजता पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच गिट्टीखदान पोलिस घटनास्थळी पोहोचले. पंचनामा केला असता वृद्धेच्या गळ्यात चाकू घुसलेला होता. प्रथमदर्शनी हा खून असावा, असे वाटले. पण, घरात तसे कोणतेच पुरावे सापडले नाही. कसून चौकशी करण्यात आली. पण, पोलिसांना काहीच सापडले नाही. वृद्धेला खोकला, गुडघेदुखी आणि मधुमेहासारखे इतर आजार होते. गेल्या काही दिवसांपासून खोकला थांबत नव्हता. यामुळे महिला त्रस्त होती. रात्री ती खूप खोकत असल्याचा आवाज इमारतीच्या सुरक्षारक्षकाला आला. त्याने सिटी वाजवली असता अचानक आवाज बंद झाला. वृद्धेने आजारपणाला कंटाळून स्वयंपाक घरातील चाकू स्वत:च्या गळ्यावर मारून घेत आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात गिट्टीखदान पोलिसांनी ही आत्महत्या दिसून येत असल्याचे सांगितले असून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: उद्योगमंत्री उदय सामंत अन् मनोज जरांगे यांची मध्यरात्री भेट; दीड तास चर्चा, जाणून घ्या कारण

WhatsApp VC Feature : व्हिडिओ कॉलिंगसाठी व्हॉट्सॲपने आणलं नवं फीचर; कसं सुरू कराल लो-लाइट मोड? काय आहे फायदा,जाणून घ्या

Vidhan Sabha Election: महायुतीने शोधला कांदे-भुजबळ विवादावर उपाय! पंकज भुजबळ विधान परिषदेवर; सुहास कांदे यांचा मार्ग मोकळा

Dream Communication : चक्क स्वप्नात बोलली दोन लोकं! शास्त्रज्ञांनी शोधला संवादाचा अद्भूत फॉर्म्युला

Latest Maharashtra News Updates : तामिळनाडूत तुफान पाऊस, शाळा महाविद्यालयांना सुट्टी

SCROLL FOR NEXT