Ashadhi Ekadashi 2024 fasting nutritious foods  eSakal
नागपूर

Ashadhi Ekadashi 2024 : खवय्यांची पंचाईत, आषाढी एकादशीला बटाटे ५०, शेंगदाणे १५० रुपये किलो

सकाळ वृत्तसेवा

Nagpur News: आषाढी एकादशीपासून पुढे श्रावण आणि भाद्रपद महिन्यात अनेक सण आहेत. विशेष म्हणजे या सणांमध्ये उपवास आणि व्रताचे महत्त्व अधिक आहे. बुधवारी आषाढी एकादशी साजरी करण्यात येणार आहे. आषाढी एकादशीचा उपवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या उपवासाच्या घरोघरी फराळाची जय्यत तयारी केली जाते. यंदा मात्र हा फराळ चांगलाच महागला आहे.

फराळाच्या ताटातील मोठा मानकरी असलेल्या बटाट्याची गतवर्षीच्या तुलनेने यंदा २० रुपयांनी भाववाढ झाली असून तो ५० रुपये किलो झाले आहे. प्रतिकिलो दराने विकला जात आहे. गरिबांचे काजू म्हणून ओळखल्या जाणारा शेंगदाणा घाऊक बाजारात २० रुपयांनी तर साबुदाणा १० ते १५ रुपयांनी तर भगर १० रुपयांनी महागली आहे.

साखरेच्या दरातही वाढ झालेली आहे. शिंगाडा पीठ आणि राजगिरा पिठाचे दर मात्र, स्थिरावलेले आहेत. पेंडखजुराच्या भावात वाढ झालेली आहे. शेंगदाण्याच्या दरात पुन्हा श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर वाढ होण्याची शक्यता आहे.

मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाचे भाव

२०२३ चे भाव - २०२४

  • भगर- ८० ते ८५- ११० ते १२०

  • साबुदाणा- ६१ ते ६५- ७५ ते ८०

  • शेंगदाणे- ११० ते ११५- १२५ ते १५०

  • पेंडखजूर- ७० ते ९०- ८० ते १२०

  • बटाटे- २० ते २५- ४५ ते ५०

उत्पादन घटल्याने व्यापाऱ्यांनी शेंगदाणे विक्रीवर निर्बंध आणले होते. बाजारात काही दिवसांपासून शेंगदाण्याची टंचाई निर्माण झालेली होती. परिणामी शेंगदाण्याच्या दरात विक्रमी वाढ झालेली आहे. साबुदाणा, भगरीचे दरही वाढलेले आहे.

-आदर्श देशमुख, किराणा व्यापारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT