on birthday little girl father was killed nagpur crime 2 accused arrested police action Sakal
नागपूर

Nagpur Crime : चिमुकलीच्या जन्मदिनीच वडिलाचा गळा चिरून खून; मेहंदी-बखारी रस्त्यावरील घटना; 2 अटकेत

Nagpur Murder Case : रात्रीचे साडेसात वाजले तरी मुलगा घरी न आल्याने वडिलाने मुलाच्या मेहुण्याला फोनवरून विचारणा केली.

सकाळ वृत्तसेवा

Nagpur : रुग्णालयात प्रसुतीच्या कळा सुरू झाल्या. गोंडस मुलीचा जन्म झाला. पण त्‍याच वेळेला नवजात मुलीच्या वडिलांचा गळा चिरून खून झाल्याचे समोर आले. येसंबा येथील नितीन खुशाल ठाकरे (वय ३५) या इसमाचा गळा चिरून दोघांनी खून केला.

जागेश्वर विठ्ठल ठाकरे (वय ४५) रा. नांदगाव येसंबा, रामनगर आणि मंगेश पिलाजी शिवणकर (वय ३४) येसंबा कन्हान अशी आरोपींची नावे आहेत. या दोघांना अटकही झाली. मात्र, गोंडस मुलीच्या जन्मदिनीच वडिलांचा खून झाल्याने मुलीच्या येण्याचा आनंद साजरा करायचा की वडिलांच्या मृत्यूचा आक्रोश करायचा अशी स्थिती ठाकरे कुटुंबीयांची झाली. बुधवारी (ता.२६) सकाळी ही घटना उघडकीस आली.

पारशिवनी तालुक्यातील येसंबा येथील नितीन यांनी पत्नी दीपाली हिला नागपूर येथील डागा रुग्णालयात प्रसुतीकरिता मंगळवारी सायंकाळी दाखल केले. त्यानंतर जुनी कामठी येथील सासुरवाडीसाठी तो निघून गेला. रात्रीचे साडेसात वाजले तरी मुलगा घरी न आल्याने वडिलाने मुलाच्या मेहुण्याला फोनवरून विचारणा केली.

तेव्हा सातच्या सुमारास नितीन गेल्याचे त्याने सांगितले. नितीनला कधी दारू पिण्याची सवय असल्याने तो रात्री उशिरा यायचा. त्यामुळे रात्री उशिरा मुलगा घरी येईल, असे समजून वडील झोपी गेले. मात्र, रात्री नितीन घरीच आला नाही.

मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठच्या सुमारास माजी सरपंच नरेश ढोणे यांनी नितीनच्या वडिलांना त्याच्या खुनाची बातमी दिली. नितीनचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात बखारी ते मेहंदी रस्त्यावर पडलेला दिसला.

तसेच त्याचा गळा चिरून खून झाल्याचे सांगितले. त्याच्या मृतदेहाशेजारीच एमएच ४९- ए- ७५७१ क्रमांकाची दुचाकी पडून होती. दुसरीकडे डागा रुग्णालयात नितीन पत्नीला कळा आल्या आणि तिने गोंडस मुलीला जन्म दिला. पान २ वर

मात्र, त्या गोंडस मुलीला वडिलांचा चेहरा पाहायला मिळाला नाही. खुशाल ठाकरे यांनी पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. युवकाच्या गळ्यावर व डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून आरोपी पळून गेल्याचे निष्पन्न झाले.

लागलीच घटनास्थळी डॉग युनिट, फॉरेंसिक पथकाला पाचारण करण्यात आले. पारशिवनी पोलिसांना आरोपींना शोधण्यात यश आले. दोघांनाही ताब्यात घेतले असून पोलिस निरीक्षक थोरात यांच्या मार्गदर्शनात पारशिवनी पोलिस तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्स-निफ्टी अडीच टक्क्यांनी वाढले, आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये तुफान खरेदी

AUS vs IND 1st Test: पहिल्याच दिवशी १७ विकेट्स! भारत-ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कोलमडली, पण गोलंदाजांनी मैदान गाजवलं

Parkash Ambedkar : सत्तेत सहभागी होण्याबाबत प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका, ते म्हणाले...

Maharashtra Assembly Election : सट्टाबाजारामध्ये महायुती ‘फेव्हरिट’!महाआघाडीला १ रुपयाला २ रुपये १५ पैसे भाव

Latest Maharashtra News Updates : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यांनी घेतला शहरी वृक्ष व्यवस्थापन कार्यशाळेत भाग

SCROLL FOR NEXT