one killed over bad words about his girlfriend midc police arrested 4 nagpur Sakal
नागपूर

Nagpur Crime News : ‘ती’ वाईट आहे म्हणताच बादलवर केले सपासप वार

सकाळ वृत्तसेवा

Nagpur Crime News : सलग दुसऱ्या दिवशी उपराजधानी खुनाच्या प्रकरणाने हादरली आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दिननगर परिसरात रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास २७ वर्षीय युवकाचा प्रेयसीबाबत वाईट बोलण्यावरून प्रियकराने मित्रांच्या साहाय्याने खून केला. याप्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलासह चौघांना ताब्यात घेतले आहे.

बादल भाऊराव निंबार्ते ( वय २७, रा.भीमनगर, बुद्ध विहारजवळ, एमआयडीसी) असे मृत युवकाचे नाव आहे. राज अनिल पाटील (वय १९, रा. भीमनगर, बुद्धविहाराजवळ, एमआयडीसी), अर्जुन हरीशंकर कहार (वय २६, रा.राय टाऊन) अशी आरोपींची नावे असून त्याच्यासह दोन अल्पवयीन आरोपींचा समावेश आहे. गंगा महेसुर्दीन पांडे (वय २० रा इंदिरामात नगर) हा फरार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बादल हा एमआयडीसीमध्ये कंत्राटी पद्धतीने युवकांना नोकरीवर लावून देण्याचे काम करीत होता. राज हा त्याच्याच घराजवळ राहतो. त्याच्या प्रेयसीला बादलने प्रपोज केले होते.

मात्र, तिने त्याला नकार दिल्याने बादल तिच्याबाबत सातत्याने राजकडे वाईट सांगायचा. अनेकदा त्यातून दोघांमध्ये वादही झाला होता. तेव्हा बादलला बघून घेण्याची धमकी राजने दिली होती. शनिवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास बादल घरी असताना, त्याला राजने परिसरातील सावित्रीबाई फुले अंगणवाडी समोर भेटण्यासाठी बोलाविले. बादल येताच, त्याने पुन्हा माझ्या प्रेयसीबाबत का वाईट बोलतोस असा प्रश्‍न बादलला केला. बादलने ती तशीच असल्याचे सांगताच, राज संतापला. त्याने बादलशी वाद घालून खिशातून चाकू काढला.

याशिवाय त्याच्या चार साथीदारांनी रॉडने बादलला मारहाण सुरू केली. राजने त्याच्या पोटात आणि मानेवर चाकूने वार करून त्याला रक्‍ताच्या थारोळ्यात लोळविले आणि पसार झाले. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण काळे यांनी ताफ्यासह परिसर गाठला. पंचनामा करीत, मृतदेह मेडिकलकडे रवाना केला. याशिवाय गुन्हा दाखल करीत, तत्काळ चार आरोपींना अटक केली. गंगा महेसुर्दीन पांडे अद्याप फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे.

उमरेड येथे दगडाने ठेचून तरुणाचा खून

मोहपा रस्त्यावरील एमआयडीसी परिसरात एका ३४ वर्षीय युवकाचा दगडाने ठेचून खून झाला. ही घटना रविवारी सकाळी उजेडात आली. नीतेश कवडू जाधव असे या युवकाचे नाव आहे. शनिवारी रात्री नीतेश हा घरी खाटेवर बसला होता. तेव्हाच महादेव ऊर्फ जकिरा याने घरात प्रवेश करून नीतेशसोबत भांडण केले. दरम्यान रागाच्या भरात महादेव याने नीतेशच्या डोक्यावर दगडाने वार केला. अनेक वार केल्यानंतर आरोपी महादेव जाधव पळून गेला. याप्रकरणी फिर्यादीने उमरेड पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी महादेव जाधव याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला असून त्याचा शोध घेत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT