नागपूर : रेल्वेगाड्यांच्या हालचालीचे निरीक्षण आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नागपूरसह विभागातील १७ रेल्वेस्थानकावरील फूट ओव्हर ब्रिज (एफओबी)वर ‘ऑनलाइन’ सोलार कॅमेरे बसविण्यात आले आहे. रेल्वे इंजिनच्या पॅन्टोग्राफ स्थितीचे निरीक्षण सीसीटीव्हीद्वारे केले जाणार आहे. या व्यवस्थेमुळे संभाव्य तांत्रिक दोष वेळीच दूर करून विना अडथळा संचालन शक्य होणार असून याचा थेट लाभ प्रवाशांना होणार आहे.
‘अप’ आणि ‘डाऊन’ दोन्ही दिशेने जाणाऱ्या गाड्यांवरील पॅन्टोग्राफच्या स्थितीचे निरीक्षण करण्यासाठी कॅमेरे डिझाइन केले आहे. तसेच ट्रॅक्शन पॉवर कंट्रोल रूममध्ये बसून पॅन्टोग्राफच्या स्थितीवर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे.
तसेच रिअल टाइम मॉनिटरिंग करता येईल. चालत्या गाड्यांच्या पॅन्टोग्राफमध्ये कोणताही बिघाड तत्काळ ओळखता येणार आहे. असामान्य घटना किंवा पॅन्टोग्राफ अडकण्याच्या प्रकरणांमध्ये त्वरित तपासणी आणि निराकरण करण्यासाठी उपयुक्त होईल. रेल्वे वाहतुकीतील व्यत्यय लक्षणीयरित्या कमी होऊ शकेल. तसेच अन्य ओव्हरहेड उपकरणांच्या विशिष्ट विभागाची ओळख करण्यास मदत होणार आहे.
नागपूर, अजनी, खापरी, बुटीबोरी, सेवाग्राम, वर्धा, धामणगाव, वरोरा, चंद्रपूर, बल्लारशाह, काटोल, पांढुर्णा, मुलताई, परासिया, आमला, बैतूल आणि घोडाडोंगरी या स्थानकांवर ‘ऑनलाइन सोलर’ कॅमेरे लावण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.