only two hours for registration of corona vaccination in nagpur 
नागपूर

नागपूरकरांनो! लसीकरण नोंदणीसाठी फक्त दोन तास, घरूनही करू शकता नोंदणी

राजेश प्रायकर

नागपूर : महापालिकेच्या झोन कार्यालयांत कोविड लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी करण्यात येत आहे. गर्दी लक्षात घेता लसीकरण नोंदणीसाठी महापालिकेने उद्यापासून केवळ दोन तास वेळ निश्चित केली आहे. परंतु, या निर्णयामुळे नोंदणीसाठीच गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गर्दी पाहता नागरिक खासगी रुग्णालयांकडे वळतील. त्यामुळे खासगी रुग्णालयांना फायदा पोहोचविण्याचा घाट महापालिकेने घातला असल्याची चर्चा रंगली आहे. 

कोविड लसीकरणासाठी होणारी गर्दी आणि नागरिकांची होणारी गैरसोय पाहता झोन कार्यालयातून ऑनलाइन नोंदणी आजपासून दहाही झोन कार्यालयामध्ये दुपारी १२ वाजतापासून सुरू करण्यात आली. परंतु, नोंदणी व त्यानंतर लसीकरणासाठी गर्दी झाली. त्यामुळे आता महापालिकेने उद्या शुक्रवारपासून रविवार वगळता दररोज सकाळी १०.३० ते १२.३० या वेळेतच नोंदणी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या दोन तासांमध्येच झोन कार्यालयात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेचा हा निर्णय ज्येष्ठ नागरिकांसाठी आणखी तापदायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घरून लसीकरणासाठी नोंदणी करणेही शक्य आहे. परंतु, ज्यांच्याकडे ऑनलाइन नोंदणीची व्यवस्था नाही, अशा नागरिकांसाठी मनपातर्फे विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान, २९ खासगी रुग्णालयातूनही लसीकरण सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे गर्दीऐवजी अनेक नागरिक खासगीकडे वळण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने निश्चित केलेली दोन तासांची वेळ खासगी रुग्णालयांना आर्थिक लाभ पोहोचविण्यासाठी असल्याची चर्चा रंगली आहे. 

अडीच हजारांवर ज्येष्ठांचे लसीकरण - 
आज महापालिकेच्या लसीकरण केंद्रांसह खासगी रुग्णालयांत २ हजार ५५० ज्येष्ठ नागरिकांनी लस घेतली. एवढेच नव्हे तर ४५ ते ६० वयोगटातील विविध आजार असलेल्या ५१० नागरिकांनी लसीकरण केले. यातील १ हजार २१८ ज्येष्ठांनी तर ४५ ते ६० वयोगटातील २९४ नागरिकांनी खासगी रुग्णालयात अडीचशे रुपये देऊन लस घेतली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: जितेंद्र आव्हाड यांची विजयाच्या वाटेने वाटचाल!

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे शिवाजी कर्डिले १४९८४ मतांनी आघाडीवर.

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT