नागपूर : गावाकडील शेतीचा प्रयोग अस्वस्थ करत असताना लोखंड ट्रेडिंगच्या व्यवसाय करता करता घरीच गच्चीवर पालेभाज्यांची परसबाग फुलविण्याची कल्पना सुचली़. त्यानुसार जवळपास १५ प्रकारच्या पालेभाज्या अन् फळांसोबतच फुलबागही फुलविली. यामध्ये कुठल्याही प्रकारचे रासायनिक खतं वापरले नाहीत. यामुळे लॉकडाऊनच्या काळातील तीन ते चार महिन्यांचा पालेभाज्यांचा प्रश्न सुटला. विशेष म्हणजे गेल्या १५ वर्षांपासून हा मॉडर्न सेंद्रीय शेतीचा उपक्रम सुरू आहे.
कृष्णा सांबारे, असे या व्यापाऱ्याचे नाव असून ते जुना सुभेदार ले-आऊट येथे राहतात. सध्या ते लोखंडाच्या ट्रेडिंग व्यवसायातून मुक्त झाले आहे. नागपूर जवळच असलेल्या पांजरी गावाजवळ त्यांनी शेतीत आणि घरच्या पारस बागेत स्वतःला गुंतवणूक घेतले आहे. शहरातील जुना सुभेदार ले-आउट परिसरात तीन हजार स्क्वेअर फुटात घर उभारले आणि या घरावरच कृष्णा आणि त्यांच्या पत्नी माया यांना पालेभाज्यांचा प्रयोग सुरू केला. दोघांनी मिळून काळी माती आणली़ काही कुंड्या आणल्या़ तसेच लागणारी काही साधने जमवली़. त्यानंतर दोघांच्या प्रयत्नातून तब्बल पंधरा वर्षांपासून पालेभाज्यांची बाग फुलवली़. या कुंड्यांमध्ये पालेभाज्यांची लागवड केली़. कोरोनाच्या काळात या पालेभाज्या आमच्या परिवारासाठी नवसंजीवनी देणाऱ्या ठरल्या, असे सांबारे यांनी सांगितले.
टेरेसवर, बंगल्याच्या साईड मार्जिनमध्ये आणि परसबागेसाठी जागा असेल तर तेथेही गार्डन विकसित करण्याचा ट्रेंड वाढत आहे़. थोडी जागा असेल तर पाच-सहा जणांच्या कुटुंबाला पुरेल इतका भाजीपाला घरीच पिकवता येतो़. शिवाय बाग फुलवण्याचे समाधानही लाभते आहे़.
१५ प्रकारच्या पालेभाज्या -
घराच्या गच्चीवर परसबाग करण्यासाठी वॉटरप्रूफिंगचे काम करवून घेतले़. त्यावर पॉलिथीन अंथरून लसूण, अद्रक, हळद आणि मिरचीची पेस्ट करून खत तयार केले. कंपोस्ट खत यांचे मिश्रण मातीच्या कुंड्यात भरून पालेभाज्या लावल्या़. मेथी, मिरची, पालक, कोथिंबीर, भोपळा, वांगी, टोमॅटो, दुधीभोपळा, दोडके, कारले, हळद, चवळीच्या शेंगा आणि वालाच्या शेंगा, काकडीसह १५ प्रकारच्या पालेभाज्या लावल्या आहेत़. त्याची कृष्णा सांबारे देखभाल करतात़. त्यानंतर त्यांच्या पत्नी पाणी, गावरान खते घालतात. या परसबागेमुळे घराची शोभा तर वाढली आहे़. घरातील लहान मुलांना वनस्पतींच्या लागवडीविषयी, उपयुक्ततेविषयी माहिती मिळते आहे. या कामात मुलगा अभिजित, सून अपेक्षा, नातू आर्यन आणि अलिशा मदत करीत असते.
८ प्रकारची फुले -
अॅस्टर, गुलाब, शेवंती, डच गुलाब, जरबेला, नोलिना, वॉटर लिली.
द्राक्ष्यांची वेल संरक्षक -
उन्हाळ्यात शहरातील तापमान ४५ ते ४६ अंश सेल्सिअसपर्यंत जाते. त्या तापमानात अनेक फुल आणि भाज्यांवर संक्रांत येते. त्या वाळू लागतात. त्यासाठी आताच द्राक्षाची वेल लावण्यात आली आहे. त्या वेलीला संपूर्ण फुले व भाज्यांच्या रोपांवर पसरवण्यात येत असल्याने फिल्टर झालेले सूर्यकिरणे या रोपांना मिळतात. त्यामुळे रोपांचे संरक्षण होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.