over 12 thousands corona patients found in one week in Nagpur  
नागपूर

हाहाकार! उपराजधानीत आठवडाभरात १२ हजार नव्या कोरोनाबाधितांची भर; आज नवे २ हजार २५२ रुग्ण 

केवळ जीवनतारे

नागपूर ः कोरोनाचा कहर जिल्ह्यात थांबत नसल्याचे दिसून येत असून जिल्ह्यात रविवारी (ता.१४) २ हजार २५२ कोरोनाबाधितांची नव्याने नोंद झाली. सलग दुसऱ्या दिवशीही बावीसशेवर रुग्ण आढळले. तर ८ ते १४ मार्च या आठवडाभरात तब्बल १२ हजार ७७३ कोरोनाबाधितांची नोंद प्रशासनदरबारी झाली. मात्र कोविड सेंटर सुरू करण्याबाबत प्रशासन कोणतीही हालचाल करीत नाही. गृहविलगीकरणावरच भर देत असल्यानेच कोरोनाची स्थिती गंभीर होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लहर सुरू झाली. रविवारी शहरात ८ हजार ३८६ व ग्रामीणमध्ये ४ हजार २८७ अशा १२ हजार ६७३ चाचण्या करण्यात आल्यात. यापैकी तब्बल २ हजार २५२ जणांचे अहवाल कोरोनाबाधित आढळून आले. यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ७० हजार ५०२ वर जाऊन पोहचली आहे. दिवसभरात शहरातील ७ , ग्रामीणभागातील ३ तर जिल्ह्याबाहेरच्या २ अशा एकूण १२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबळींची संख्या ४ हजार ४५९ झाली आहे. रविवारी दिवसभरात १०३३ जणांनी कोरोनावर मात केली.

लक्षणे नसलेले १२ हजार कोरोनाबाधित धोकादायक

गृहविलगीकरणात असलेल्या १२ हजार ७१ कोरोनाबाधितांना लक्षणेच नाही. काही जुजबी लक्षणे आहेत. मात्र हेच कोरोनाबाधित सामुहिक संसर्गासाठी धोकादायक ठरत आहेत. याकडे प्रशासनाचे लक्ष नाही.

धंतोलीत एलआयसी कॉलनी सील'

धंतोली या वर्दळीच्या मध्यवर्ती भागातील एलआयसी कॉलनीत १८ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे ही कॉलनी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली. कॉलनीत शुक्रवारी मोबाईल चाचणी केंद्राद्वारे येथील नागरिकांची कोरोना केल्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी सांगितले.

लक्ष्मीनगर झोनमध्ये १५२ सुपर स्प्रेडर

लक्ष्मीनगर झोनमध्ये आज १५२ सुपर स्प्रेडर आढळून आले. यात १०२ जण खामला येथील असून ५० जयताळा येथील आहेत. या सर्वांची तपासणी करण्यात आली. याशिवाय शहराच्या विविध भागांमध्येही मोबाईल चाचणी केंद्र फिरवून चाचण्या करण्यात येत आहे. नागरिकांनी चाचणी करून घ्यावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amruta fadnavis on CM Post: महायुतीचा मोठा विजय, राजकीय चर्चेला उधाण! मुख्यमंत्री पदाबाबत अमृता फडणवीस म्हणाल्या...

Chandgad Assembly Election 2024 Results : चंदगडला भाजपचे बंडखोर उमेदवार शिवाजी पाटील ठरले जायंट किलर; मिळवला मोठ्या मताधिक्याने विजय

Devendra Fadnavis: कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्रीपद कुठल्याही निकषांवर नाही!

BJP Candidate Ravisheth Patil Won Pen Assembly Election : प्रसाद भोईर यांना पराभूत करत भाजपच्या रवीशेठ पाटीलांचा दणदणीत विजय

Sneha Dubey Vasai Assembly Election 2024 Result: वसई मतदारसंघात भाजपचा झेंडा फडकला; स्नेहा दुबे यांनी मारली बाजी

SCROLL FOR NEXT