नागपूर

नागपुरात झोपडपट्ट्यांसह तब्बल सव्वाशे वस्त्यांना पुराचा धोका

राजेश प्रायकर

नागपूर : यंदा जोरदार पावसाच्या (Monsoon in Nagpur) पार्श्वभूमीवर शहरातील झोपडपट्ट्यांसह सव्वाशे वस्त्यांतील लाखो नागरिकांत भीती निर्माण झाली आहे. शहर स्मार्ट सिटी (Smart city Nagpur) करताना पावसाळ्यात पुराचा धोका असलेल्या वस्त्यांचा मात्र महापालिकेला (Nagpur NMC) विसर पडल्याने गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांना पावसाळ्यात घरातील साहित्य, धान्याचे नुकसान सोसावे लागत आहे. (over 125 slums in Nagpur have danger of flood this rainy season)

उड्डाणपूल, सिमेंट रस्ते, मेट्रोमुळे गेल्या काही वर्षांत शहराचा चेहरा मोहरा बदलला. परंतु पावसाळ्यात झोपडपट्ट्यांसह सव्वाशे वस्त्यांतील नागरिकांची अवस्था आजही जैसे थे आहे. रोज कमावून खाणाऱ्या वर्गाला अनेक वर्षात महापालिकेने पावसाळ्यात पुरापासून बचावासाठी कुठलेही नियोजन केले नाही. आजही अनेक नाल्यांच्या संरक्षक भिंत नाही. काही नाल्यांच्या संरक्षक भिंती तुटलेल्या आहेत. काही वस्त्या अगदी खोलगट भागात आहे.

अलीकडेच बांधण्यात आलेले सिमेंट रस्ते उंच झाल्यानेही पावसाचे पाणी जाण्यासाठी मार्ग नाही. त्यामुळे या वस्त्यांमधील नागरिकांना पाऊस आल्यानंतर भीतीने रात्र जागरण करून काढावी लागत आहे. दरवर्षी या झोपडपट्ट्या तसेच वस्त्यांमध्ये पाणी शिरत आहे. महापालिकेकडून नुकताच पूरस्थितीवर नियंत्रणासाठी उपाययोजना घोषित करण्यात आल्या. यात केवळ अतिवृष्टीच्या काळात या नागरिकांना समाजभवन किंवा शाळांमध्ये ठेवण्यापलिकडे काहीच नाही. हीच दरवर्षीची पद्धत आहे. विशेष म्हणजे नुकसान झालेल्या नागरिकांना भरपाई दिली जात नाही. अनेकदा नाल्याच्या काठावरील नागरिकांची घरेही वाहून जातात.

सत्ताधाऱ्यांकडून केवळ मतांसाठीच वापर

सत्ताधारी कोणताही पक्ष असो आजपर्यंत या नागरिकांचा केवळ वोटबॅंक म्हणूनच लाभ घेण्यात आला. परंतु आतापर्यंत झालेल्या एकाही सत्ताधाऱ्यांनी या संकटातून काढण्यासाठी इच्छाशक्ती दाखविली नाही.

धोका असलेल्या प्रमुख झोपडपट्ट्या

वसंतराव नाईक झोपडपट्टी, काछीपुरा, दंतेश्वर झोपडपट्टी, कुंभार टोली झोपडपट्टी, सावित्रीबाई फुलेनगर, आंबेडकरनगर, सुभाषनगर, शिवनगर, धनगरपुरा, सुदामनगर, सेवानगर, राजीवनगर, संजयनगर, अमरनगर, टीव्ही टॉवर, आझादनगर मानकापूर, मोतीबाग, ज्योतीनगर, संजय गांधीनगर, इंदिरा मातानगर, धम्मदीपनगर, पंचशीलनगर, आदर्शनगर, पिवळी नदी झोपडपट्टी, ताजनगर, हिवरेनगर, इंदिरा गांधी झोपडपट्टी, संघर्षनगर, नेहरूनगर, हत्तीनाला, चंद्रनगर, काशीबाई देऊळ, धम्मनगर, अंसारनगर, गार्ड लाईन, भांडे प्लॉट, राणी भोसलेनगर, रघुजीनगर, ताजबाग, नंदनवन, चंदननगर, हसनबाग व इतर झोपडपट्ट्या.

शहरात पाणी साचणारे ठिकाण -- ६६

पुराचे पाणी शिरत असलेल्या झोपडपट्ट्या -- ८५

पुराचे पाणी शिरत असलेल्या वस्त्या -- ४०

पावसाळ्यादरम्यान अतिवृष्टी झाल्यास अनेक सखल वस्त्यांत पाणी साचते. शिकस्त इमारतींना धोका असतो. त्यामुळे पाणी वाहून जाण्यासाठी नाल्यांची, चेंबरची सफाई तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहे.
- राजेंद्र सोनकुसरे, सभापती, स्थापत्य व प्रकल्प समिती, महापालिका

(over 125 slums in Nagpur have danger of flood this rainy season)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्रामधील मतमोजणीपूर्वी नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात जिलेबी बनवण्याची तयारी सुरु

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT