Pench Tiger Reserve sakal
नागपूर

Pench Tiger Reserve : काय झाडी, काय डोंगर अन् वाघाची डरकाळी...पेंच व्याघ्र प्रकल्पात होणार गर्दी

Pench Tiger Reserve : पेंच व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारी पुन्हा सुरू होणार आहे, पर्यटकांना वाघ आणि विविध वन्यजीवांचे दर्शन घेण्याची संधी.

ऋषिकेश साळवी (Rushikesh Salvi), सकाळ वृत्तसेवा

शितलवाडी : देशातील सर्वत्र नावाजलेला व्याघ्र प्रकल्प, अशी ओळख असलेल्या आणि जैवविविधतने नटलेल्या रामटेक तालुक्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघासह विविध वन्यजीवांचे दर्शन पर्यटकांना होते.

काय झाडी, काय डोंगर, वाघाची डरकाळी अन् मोराचा केकारव असा जंगल सफारीदरम्यान पर्यटकांना अनुभव येणाऱ्या पेंच व्याघ्र प्रकल्पातील पर्यटकांसाठी मंगळवारपासून (ता.१) जंगल सफारीतून खुली केली जाणार आहेत.वाघांसह वन्यजीवांच्या संवर्धनासाठी उपयुक्त ठरणाऱ्या रामटेक तालुक्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारीचा आनंद लुटण्यासाठी विदर्भासह विदर्भाबाहेरील पर्यटक येतात.

इतकेच नव्हे; तर या ठिकाणी आतापर्यंत अनेक व्हीव्हीआयपींनीही हजेरी लावून जंगल सफारीचा आनंद लुटला आहे. पावसाळ्याच्या दिवसांत हा व्याघ्र प्रकल्प जंगल सफारीसाठी बंद असतो. आता मंगळवारपासून पुन्हा हा व्याघ्र प्रकल्प जंगल सफारीसाठी खुला करण्यात आला आहे. या व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारी करणाऱ्यांना १५ ऑक्टोंबरपर्यंत ऑफलाइन पद्धतीने बुकींग करावी लागणार आहे. त्यानंतर ऑनलाइन बुकींगची सुविधा सुरू केली जाणार आहे.

१९७५ मध्ये व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळालेल्या रामटेक तालुक्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पात टी-६२, टी-२४, टी-१०१, नामक वाघीण तसेच टी-८५, टी-९३ नामक रुबाबदार वाघ आहे. त्यांची एक झलक बघण्याची इच्छा येथे जंगल सफारीसाठी येणाऱ्यांना असते. रामटेक तालुक्यातील पेंच व्याघ्र प्रकल्प जंगल सफारीसाठी खुला होणे, ही बाब वन्यजीव प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे.

बफर क्षेत्रात राहते ‘टायरगरची मुव्हमेंट’

१९७५ मध्ये व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळालेल्या सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्पाचा कोअर झोन ४३९.८४ कि.मी, तर बफर झोन २०५.०३ कि.मी. इतका आहे. या व्याघ्र प्रकल्पात सुमारे ५५अधिक प्रौढ वाघांचे वास्तव्य आहे. या व्याघ्र प्रकल्पाचे कोअर क्षेत्र वाघ, बिबट, अस्वल आदी वन्य जीवांच्या संवर्धनासाठी उपयुक्त ठरत असून; पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातही वाघांची मुव्हमेंट असते.

  • ७० जीप्सी जंगल सफारीसाठी

  • ५० पेक्षा अधिक प्रौढ वाघांचे वास्तव्य

  • ४३९.८४कि.मी कोअर क्षेत्र

  • २०५.०३ कि.मी बफर क्षेत्र

पेंच व्याघ्र प्रकल्पात मंगळवारपासून जंगल सफारी सुरू होत आहे. सुरूवातीपासूनच ऑनलाइन बुकींग सुरू झालेली आहे. सफारीकरीता सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

- विवेक राजुरकर, वनपरिक्षेत्र अधिकारी पेंच व्याघ्र प्रकल्प, सिल्लारी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli MIDC Fire : सांगली एमआयडीसीतील केमिकल कंपनीत वायू गळती; दोघांचा मृत्यू, 10 जणांची अवस्था गंभीर

IPL Schedule: क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! पुढील 3 हंगामाच्या तारखा BCCI ने केल्या जाहीर

Latest Maharashtra News Updates : निकालाच्या पार्श्वभूमीवर 'मविआ'च्या प्रमुख नेत्यांत 'हाॅटेल हयात'मध्ये तब्बल अडीच तास चालली बैठक

Pre Wedding Photoshoot: 'या' लोकेशनवर फोटोग्राफरशिवायही करू शकता जोडीदारासोबत परफेक्ट फोटोशुट

Google Gemini : गुगल जेमीनीची मेमरी झाली शार्प! काय आहे या नव्या फीचरमध्ये खास?

SCROLL FOR NEXT