jijau multistate society investor finance fraud forward to sit police beed crime sakal
नागपूर

Nagpur Fraud Case:कर्जाच्या नावावर दोन कोटींनी फसवणूक ,आरोपीला मुंबईतून अटक सहा दिवसांची पोलीस कोठडी

व्यवसायासाठी कर्ज मिळत नसल्याने एनजीओच्या माध्यमातून २० कोटीचे कर्ज मिळवून देतो असे सांगून एका इसमाची दोन कोटी रुपयांची फसवणूक केली.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur Loan Fraud Case: व्यवसायासाठी कर्ज मिळत नसल्याने एनजीओच्या माध्यमातून २० कोटीचे कर्ज मिळवून देतो असे सांगून एका इसमाची दोन कोटी रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबईतून आरोपीस अटक केली. त्याला सहा दिवसाची पोलिस कोठडीही मिळविली.

आकाश मनोहर पाटील (रा. मुंबई) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर भास्कर चट्टे यांना व्यवसायासाठी २० कोटी रुपयांचे कर्ज हवे होते. मात्र, त्यांना इतके कर्ज बॅंकेकडून मिळत नसल्याने त्यांनी इतरत्र शोध सुरू केला होता. दरम्यान त्यांच्या एका मित्राने त्यांच्या अपार्टमेंटमध्ये आकाश पाटील याचा एक एनजीओ असून त्याच्या माध्यमातून मोठ-मोठ्या कंपन्या ‘सीएसआर’ करतात. त्याच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करण्यात येत असल्याची माहिती दिली. यावेळी समीर आणि त्याची पत्नी यशश्री यांनी आकाश पाटील यांच्याशी संपर्क साधला.

दरम्यान त्याने त्यांना २० कोटी रुपयाचे व्यवसायिक कर्ज मंजूर करण्याची खात्री दिली. मात्र, त्यासाठी प्रोसेसिंग फी व कमीशन फी यासाठी दोन कोटी द्यावे लागतील असे सांगितले. समीर आणि यशश्री तयार झाल्याने त्यांनी आरटीजीएस करीत, ती रक्कम त्याच्या खात्यात वेळोवेळी टाकली.

कर्जाच्या नावावर दोन कोटीची फसवणूक

दरम्यान आकाश पाटील याने त्यांना भोपाळच्या दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या नावाने बनावट धनादेश मोबाईलवर पाठवून २० कोटी रुपयाचे कर्ज मंजूर झाल्याचे सांगितले. मात्र, त्यानंतरही त्यांच्या खात्यात पैसे जमा न झाल्याने त्यांनी आकाशशी संपर्क केला. त्याने प्रतिसाद न दिल्याने फसवणूक झाल्याचे कळताच, त्यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली.

यावेळी प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात पोलिस उपायुक्त अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अमोल देशमुख यांच्या नेतृत्त्वात पोलिस हवालदार नरेश बढेल, चंद्रशेखर घागरे, आशिष लक्षणे, शिपाई प्रीती धुर्वे यांनी त्याचा आरोपीतांचे बॅक खात्यासंबंधाने माहीती प्राप्त केली. तसेच मुंबईतून २८ ऑक्टोबरला आकाशला अटक केली. त्याच्याकडून २ मोबाईल फोन, फसवणुकीच्या रकमेतून खरेदी केलेली स्थावर मालमत्ता, सोने, ८५ हजार रोख असा एकुण १५ लाख ७० हजाराचा मुद्देमाल जप्त केला. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपाचे अतुल भातखळकर आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT