कोदामेंढी (जि. नागपूर) : धान्य वाटप (Grain distribution) करताना पारदर्शकता असावी यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने (Department of Food and Civil Supplies) पॉश मशीन व आधार लिंक कार्यान्वित केले. मात्र, त्यातही शक्कल लढवत चक्क मृत व्यक्तीच्या नावाने धान्याची उचल करीत रास्त धान्य दुकानदाराने डल्ला मारला. मृत व्यक्तीचे धान्य कुटुंबप्रमुखाला मिळाले नाही. ते धान्य नेमके कुठे गेले, असा सवाल पुढे आला आहे. (Picking up grain in the name of the deceased at the ration shop)
मौदा तालुक्यातील मुरमाडी येथील रास्त धान्य दुकानदार आठ ते दहा वर्षांपासून मृत व्यक्तीच्या नावाने धान्य उचल करीत आहे. मृत व्यक्तीचे धान्य पुरवठा विभागामार्फत दुकानदाराला पुरवठादेखील करण्यात येते. मात्र, ते धान्य कुटुंबप्रमुखाला न देता सदर धान्याचा काळाबाजार दुकानदार करीत आहे. शिधापत्रिकेवर प्रति व्यक्ती दर महिन्याला पाच किलो गहू आणि तांदूळ मिळतो. त्याचबरोबर वर्गवारीनुसार अंत्योदय आणि दारिद्र्यरेषेखालील कुटुंबीयांना ३५ किलो धान्य व साखर मिळते.
मुरमाडी येथील रास्त दुकानदार मागील आठ ते दहा वर्षांपासून गावातील जवळपास ३२ मृत व्यक्तींचे धान्य घशात घालत आहे. या मृत व्यक्तींचे धान्य पुरवठा विभागामार्फत पुरवठादेखील सुरळीत सुरू असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. दुकानदार पॉश मशीनद्वारे कुटुंबप्रमुखाचा थम्ब लावून धान्य वितरण करीत असतो.
मात्र, कुटुंबातील मृत व्यक्तीचे धान्यपुरवठा बंद झाल्याचे सांगून ते धान्य घशात घालून त्याचा काळाबाजार करतो. दुकानदाराने आजपावेतो जवळपास दोन हजार क्विंटलपेक्षा अधिक धान्यावर डल्ला मारला आहे. खुल्या बाजारात त्याची विक्री करून लाखो रुपये कमविले आहेत. यात पुरवठा विभागाचेदेखील काही कर्मचारी सहभागी असल्याची शंका बळावली आहे. याकडे संबंधित विभागाने वेळीच लक्ष घालणे गरजेचे आहे.
असे केल्यास सोयीचे
प्रत्येक ग्रामपंचायतीने मृत्यूचा दाखल देताना त्यांच्या शिधापत्रिकेची झेरॉक्स प्रत मागावी. दर महिन्याला ग्रामपंचायतीकडून मृत व्यक्तीच्या नावाची यादी पुरवठा विभागाकडे नाव कमी करण्यासाठी सादर करावी. तसेच लग्न होऊन गेलेल्या मुलींसाठीदेखील असे करता येऊ शकते.
मृत व्यक्तीच्या नावाची यादी दुकानदार आमच्याकडे देतो. त्यानुसार आम्ही त्यांचे नाव कमी करतो व त्यांचा पुरवठा बंद करण्यात येतो. याबाबत निवेदन आले आहे. चौकशी करण्यात येईल. (Picking up grain in the name of the deceased at the ration shop)- संदीप शिंदे, पुरवठा अधिकारी, मौदा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.