PM Kisan Sanman Yojana: प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत १६वा हप्ता व नमो किसान महासन्मान निधीचा दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे राज्यातील लाभार्थ्यांना वितरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. जिल्ह्यातील कुणीही पात्र व्यक्ती योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे.
पीएम किसान योजनेत सर्व पात्र लाभार्थ्यांचे ई-केवायसी, बँक खाते आधार संलग्न करणे व भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत करणे या बाबी शासनाने बंधनकारक केलेल्या आहेत. तरी ज्या लाभार्थ्यांचे ई-केवायसी व बँक खाते आधार संलग्न नाही अशा व्यक्तींनी तत्काळ पूर्तता करून घ्यावी.
याबाबत कृषी विभागामार्फत मोहिमही राबविण्यात आली; पण अद्यापही जिल्ह्यात एकूण तीन हजार १०५ व्यक्तींची ई-केवायसी व पाच हजार ३३६ व्यक्तींचे बँक खाते आधार संलग्नीकरण प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे. तरी सर्व लाभार्थींनी शासनाने बंधनकारक केलेल्या बाबींची पूर्तता करून घ्यावी. काही अडचण असल्यास संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा कृषी सहाय्यकाशी संपर्क करावा, असे आवाहन किरवे यांनी केले. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.