Nagpur News : पोलिसांनी अभियान सुरू करीत चार महिन्यांत दीड कोटी रुपयांचे अंमली पदार्थ (ड्रग्ज) जप्त केले. या कारवाईत १०३ पेडलरला अटकही करण्यात आली. मात्र, मुख्य सूत्रधार अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेले नाही. त्यामुळे शहरात अंमली पदार्थांच्या, विशेष म्हणजे एमडीच्या तस्करीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. यामुळे या काळ्या धंद्याची पाळेमुळे खोलवर पसरल्याचा कयास लावला जात आहे.
गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ७ मे रोजी मध्यरात्री केलेल्या कारवाईत कुख्यात एमडी तस्कर ईकबाल शेख तय्यब शेख (वय ४०, रा. जुना बिडीपेठ) याला ५०.८१ ग्रॅम एमडीसह सापळा रचून लावून अटक केली. गेल्या काही महिन्यांत पथकाने केलेली ही मोठी कारवाई होती. त्यानंतरही छोट्या पेडलरकडून सातत्याने एमडीसह गांजा तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे.
गेल्या वर्षी अंमली पदार्थविरोधी पथकाने केलेल्या कारवाईत ४०४ प्रकरणांत ३ कोटी ४३ लाख १८ हजार ९८५ रुपयांचे पदार्थ जप्त केले. यामध्ये गांजा प्रकरणात ८६ गुन्हे तर एमडी प्रकरणात ५५ प्रकरणे दाखल करण्यात आली.
त्यात गांजा प्रकरणी १११ तर एमडी प्रकरणी ८७ जणांना अटक करण्यात आली. याशिवाय ३ कोटी ३५ लाख ५१ हजार ७५ रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला. यंदाही चार महिन्यातच दीड कोटींचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे.
यामध्ये १२ प्रकरणांत १ कोटी २० लाख रुपयाहून अधिक १ किलो ५७ ग्रॅम एमडी जप्त करीत, २५ जणांना अटक करण्यात आली. विशेष म्हणजे, गांजाच्या ३३ प्रकरणात ३८ लाख ९४ हजार ७०० रुपयाचा माल जप्त करीत ४० जणांना अटक करण्यात आली. मात्र, कारवाईचे प्रमाण वाढले असतानाही मुख्य विक्रेत्यांसह त्यांच्या सिंडिकेटपर्यंत पोहचण्यात पोलिसांना अपयश येत असल्याचे दिसून येते.
नागपुरात येणारा गांजा साधारणतः मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमधून तर एमडीची तस्करी मुंबईतून होताना दिसून येते. यापूर्वी सोनेगाव पोलिस ठाण्यांतर्गत पोलिसांनी गेल्यावर्षी दोन कोटी रुपयांचे एमडी जप्त केले होते. त्यामुळे शहरात एमडीचे जाळे वाढत असल्याचे दिसून येत आहे.
अंमली पदार्थ - गुन्हे दाखल - वजन - किंमत -अटक आरोपी
गांजा- ८- ४०७ कि.४४० ग्रॅम -६९,३७,१२५- १११
गर्द -२ -१० ग्रॅम ७९ मिलिग्रॅम -२८,३७० -४
एमडी - ५५- २ किलो ६७३ ग्रॅम -२,६५,७२, ६८० -८७
अंमली पदार्थ - गुन्हे दाखल- वजन- किंमत- अटक आरोपी
गांजा- ३३ -९१ कि. ३६९ ग्रॅम -६९,३७,१२५- १११
एमडी -१२ १ कि. ५७ ग्रॅम -१,०७,९८,३५०- २५
डोडा -१ -३ कि. १२४ ग्रॅम -२६,०००
पिने -३१ -३६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.