Political riots in five Gram Panchayat elections 
नागपूर

महाविकासआघाडी व भाजपची दुसरी ‘लिटमस टेस्ट’; पाच ग्रामपंचायतीत निवडणुकीची राजकीय दंगल

अजय धर्मपुरीवार

हिंगणा (जि. नागपूर) : नागपूर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक नुकतीच पार पडली. या पाठोपाठ आता तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर झाले आहे‌. ४७ ग्रामपंचायतींची मुदत संपण्यासाठी जवळपास दोन वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून, रणधुमाळी चांगलीच रंगणार आहे. यामुळे महाविकासआघाडीविरुद्ध भाजपची दुसरी ‘लिटमस टेस्ट’ या निवडणुकीनिमित्त होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे‌.

राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे आरक्षण जाहीर केले आहे. हिंगणा तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर झाले. ४७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला बराच कालावधी शिल्लक आहे. पाच ग्रामपंचायतीच्या निवडणुका १५ जानेवारीला जाहीर झाल्या आहे. यात दाभा-येरणगाव, सातगाव, खडकी, किन्ही-धानोली, सावंगी-असोला या ग्रामपंचायतीचा समावेश आहे.

दाभा येरणगाव ग्रामपंचायतचे सरपंचपद सर्वसाधारण महिला, सातगाव (वेणा) खुला प्रवर्ग, खडकी अनुसूचित जमाती, किन्ही-धानोली सर्वसाधारण महिला, असोला-सावंगी खुला प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. सातगाव ग्रामपंचायतची निवडणूक कोरोना येण्यापूर्वीच घोषित झाली होती. त्यानुसार तहसील प्रशासनाने निवडणुकीची अर्ज प्रक्रियासुद्धा पार पडली.

१२ मार्चपर्यंत उमेदवारांनी अर्ज सुद्धा भरले होते. यानंतर कोरोनाचे संक्रमण सुरू झाल्याने निवडणुका रद्द करण्यात आल्या. यामुळे आता निवडणूक विभागाच्या आदेशानुसार मागील प्रक्रिया रद्द करण्यात येणार असल्याचे समजते. निवडणुकीसाठी उमेदवारांनी भरलेली अनामत रक्कम सुद्धा त्यांना परत मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे. निवडणुकीची प्रक्रियाच आता नव्याने होणार असल्याची माहिती हाती आली आहे.

निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांशी संवाद

१५ जानेवारीला निवडणूक होणार असल्याने भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेस या पक्षांमध्ये निवडणुकीबाबत मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. भाजप आमदार समीर मेघे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री रमेशचंद्र बंग, काँग्रेसचे माजी सत्तापक्ष नेते बाबा आष्टनकर, काँग्रेस प्रदेश समिती पदाधिकारी कुंदा राऊत, शिवसेनेचे तालुकाप्रमुख जगदीश कनेर या नेत्यांनी निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांशी संवाद सुरू केला आहे.

पहिली परीक्षा महाविकासआघाडी पास

नागपूर विभाग पदवीधर निवडणुकीत महाविकासआघाडीला यश मिळाले. यामुळे पहिली परीक्षा महाविकासआघाडीने पास केली आहे. आता दुसरी परीक्षा ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने होणार आहे. या निवडणुकीनिमित्त दुसरी ‘लिटमस टेस्ट’ होणार असल्याने या निवडणुकीकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS Test: भारतीय संघ ऑस्ट्रेलियात ४-० असं जिंकूच शकत नाही...! सुनील गावस्करांनी दिला मोलाचा सल्ला

Dharashiv Vidhan sabha election : धाराशिवमधल्या चारही मतदारसंघांमध्ये बंडखोरी टाळण्यात महायुती अन् महाविकास आघाडीला यश; लढत स्पष्ट

Hingoli Assembly : हिंगोली जिल्ह्यात कसं आहे राजकीय गणित? कुणाविरुद्ध कोण लढणार?

"म्हणूनच मराठी अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये कामवाली बाईचं काम दिलं जातं" ; तृप्ती खामकरने सांगितलं कटू सत्य

Zip and go sadi : झिप अँड गो साडी; नवीन फॅशन ट्रेंड जो आपला लूक बनवतो स्टायलिश

SCROLL FOR NEXT