Postmortem was delayed due to mandatory testing 
नागपूर

शवागारात कोरोना मृतदेहांचा खच; चाचणी सक्तीची केल्याने पोस्टमार्टेमला होतो विलंब

केवल जीवनतारे

नागपूर : कोरोनाच्या या आणीबाणीच्या काळात आजारानंतर झालेला मृत्यू असो, खून, आत्महत्या असो की, अपघात... प्रत्येक शवाचे शवविच्छेदन सक्तीचे करण्यात आले. यामुळे मेडिकल, मेयोच्या शवविच्छेदनगृहात उत्तरीय तपासणीसाठी (पोस्टमार्टेम) आलेला मृतदेह ताब्यात मिळविण्यास नातेवाइकांना विलंब होतो. सायंकाळच्या सुमारास नैसर्गिक मृत्यू झाल्यास नातेवाइकांच्या हाती शव दुसऱ्या दिवशी मिळते. यामुळे नातेवाइकांमध्ये संतापाची लाट सुरू आहे. दूरगावी जावे लागणाऱ्यांचा एकप्रकारे हा छळ आहे. यामुळेच शवविच्छेदनाचे काम २४ तास सुरू ठेवण्यात यावे, अशी मागणी जोर धरत आहे.

कोरोनाच्या या संकटात मृत्यूचा टक्का वाढला आहे. मेडिकलमधील शवागारात क्षमतेपेक्षा जास्त कोरोनाबाधित शव गोळा होतात. हीच स्थिती मेयोतही आहे. त्यातच कोरोना नसलेला नैसर्गिक मृत्यू झालेल्यांच्या शवाची कोरोना चाचणी सक्तीची केली, यामुळे १० तास उशिराने शव नातेवाइकांच्या स्वाधीन केले जाते. मृतदेह लवकर ताब्यात मिळावा अशी नातेवाइकांची इच्छा असते. मात्र वेळेत शव मिळत नसल्याने नातेवाइकांना मनस्ताप होतो. नातेवाइकांनी शवागार २४ तास सुरू ठेवावे अशी मागणी केली आहे.

मेडिकल, मेयोत शवागारात शवविच्छेदनासाठी दर दिवसाला आणल्या जाणाऱ्या मृतदेहांची संख्या वाढत आहे. दोन दिवसांपूर्वी १८ ते २० कोरोनाचे मृतदेह शवागारात रात्रभरात जमा झाले. याशिवाय इतर आजारांनी दगावलेल्यांची संख्या ९ होती. शवागार जणू हाऊसफुल्ल झाले होते. कोरोनाचे शव शवागारातून थेट शववाहिकेतून महापालिका कर्मचारी तसेच सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींकडून थेट घाटावर नेले जाते. शवागारात रात्रभर जमा झालेले कोरोना मृत सकाळपासून घाटावर अंत्यसंस्कारासाठी नेण्याचा कार्यक्रम सुरू होतो. 

मेडिकलमध्ये २४ तास शवविच्छेदनाचा नियम

राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये २४ तास शवविच्छेदनाची व्यवस्था केली जाईल, असे आश्वासन तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी २०१३ मध्ये विधानसभेत दिले होते. मात्र, नंतर भाजप सत्तेवर आल्यानंतर जैसे थे झाले. २४ तास शवविच्छेदन व्हावे असा सूर अलीकडे मेडिकल, मेयोत सुरू असलेल्या चर्चेतून पुढे आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पूर्व विधानसभेत वरुण सरदेसाईंची मुसंडी

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

Assembly Election 2024 Result : चर्चांना उधाण! विधानसभेचे एक्झिट पोल खरे ठरणार का? ठिकठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे ‘बॅनर वॉर’

SCROLL FOR NEXT