Uday Samant  sakal
नागपूर

Uday Samant : महायुती सरकारच्या काळात राज्यात सर्वाधिक गुंतवणुकीचा दावा : उद्योग मंत्री उदय सामंत

Uday Samant : महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदावरून वाद आणखी चिघळला असून वर्षा गायकवाड यांनी महिलेला मुख्यमंत्रीपदाची संधी द्यावी असे विधान केले आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी महायुत्ती सरकारच्या काळात महाराष्ट्रात सर्वाधिक गुंतवणूक झाल्याचा दावा केला.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : खासदार वर्षा गायकवाड यांनी महिलेला मुख्यमंत्रीपदाची संधी द्यावी असे सांगून महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदावरून सुरू असलेल्या वादात आणखीच तेल ओतले आहे. शरद पवार यांनी संख्याबळाच्या आधारावर मुख्यमंत्री करू असे सांगून उद्धव ठाकरे यांचा दावा आधीच खोडून टाकला आहे. याकडे राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी लक्ष वेधून महाविकास आघाडीत बेबनाव असल्याचे सांगितले.

महाविकास आघाडीच्या उमेदवारावरून पंधरा दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी महत्त्वाचे वक्तव्य करून एका दगडात तीन पक्षी मारले आहेत. त्यांच्या वक्तव्यावरून ज्यांचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री होईल हे स्पष्ट होते. त्यामुळे आघाडीत आता अधिकाधिक आमदार निवडून आणण्याची स्पर्धा लागली आहे. मात्र महाविकास आघाडीने कितीही प्रयत्न केले तरी त्यांचा मुख्यमंत्री होणार नाही.

महायुतीचेच सरकार पुन्हा राज्यात स्थापन होणार आहे. दोन महिन्यानंतर हे स्पष्टच होणार आहे. तिसरी, चवथी आघाडी झाली तरी महाविकास आघाडीचा पराभव अटळ आहे. सर्वांना आघाड्या स्थापन करण्याचा अधिकार आहे. महायुतीत जागवाटपाची काही अडचण नाही. ८० टक्के जागांवर आमचे एकमत झाले आहे. तीनही पक्षांना सन्मानजनक जागा मिळणार असल्याचे सावंत म्ङणाले.

नेत्यांनी बेताल वक्तव्य करू नये

भाजपने १६० जागांवर दावा सांगितला आहे याकडे लक्ष वेधले असता उदय सामंत यांनी आकड्यांवर बोलणे टाळले. महायुतीच्या नेत्यांनी बेताल वक्तव्य करू नये असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. विदर्भात किती उद्योग आले याबद्दल विरोधी पक्षनेते वडेट्टीवार याचे लक्ष नाही. नागपूर अमरावती पूर्व आणि पश्चिम विदर्भात अनेक प्रकल्प उद्योगांना आणण्यात सरकार यशस्वी झालेले आहे. नागपूरमधून कुठलाही उद्योग इतर राज्यात गेला नाही. महायुतीच्या काळात सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात झाल्याचा दावाही यावेळी उद्योगमंत्री उदय सावंत यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''एकनाथ शिंदेंना नाराज करता येणार नाही'' दिल्लीतल्या नेत्यांची भूमिका? अमित शाह उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर? 'सीएम'ची घोषणा होण्याची शक्यता

RCB Squad IPL 2025: काहे दिया परदेस! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं 'विदेशी' प्रेम; भुवनेश्वर, कृणाल पांड्याची निवड ठरणार मास्टरस्ट्रोक

Ajit Pawar: अजित पवार विनासुरक्षा 'देवगिरी'तून बाहेर पडले; मुख्यमंत्री पदावरुन घडामोडींना वेग

IPL Mega Auction 2025: ३० लाख ते ३.८० कोटी! युवीच्या 6 Ball 6 Six विक्रमाशी बरोबरी करणाऱ्या Priyansh Arya साठी तगडी चुरस

महाराष्ट्राचं स्टेअरिंग दिल्लीच्याच हातात! बिहार पॅटर्नवर फुली? मुख्यमंत्रीपदाबाबत पडद्याआड नेमकं घडतयं तरी काय?

SCROLL FOR NEXT