Praful Patel  sakal
नागपूर

Praful Patel : महायुती विधानसभा एकत्रच लढणार;प्रफुल्ल पटेल

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : महायुती आम्‍ही एकत्रच लढणार आहोत. स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी संसदेत सांगून संभ्रम दूर केला आहे. जागा वाटप करताना वादावादी, मतभेद निर्माण होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. महायुतीसोबत प्रचार करून जनतेला आशीर्वाद मागणार आहोत असे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट)राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभेच्या निवडणुकीत मदत केली नाही. त्यामुळे भाजपचे उमेदवार पडले असा आरोप होत आहे. विधानसभेत त्यांना दूर ठेवा अशा मागण्याही होत आहेत.

दुसरीकडे पवार गटाच्यावतीने हेच आरोप भाजपवर केले जात आहेत. त्यामुळे राज्यात महायुतीबाबत संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. रविवारी अजित पवार यांनी पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाची बैठक बोलावली आहे. त्यात विधान परिषदेचा उमेदवार निश्चित केला जाईल. सध्या कोणाचे नाव निश्चित करण्यात आले नाही. आम्ही सर्व एकत्रित बसून नाव ठरवू, त्यानंतर जाहीर करू, असेही पटेल म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT