नागपूर

Pre Marital Disease Divorce: पत्नीचा डावा डोळा गाढ झोपेतही उघडा, घटस्फोटासाठी पतीची न्यायालयात धाव, कोर्ट म्हणालं....

मुलीला डोळ्याचा आजार होता. लग्नानंतर ते उघड झाल्याने संबंधितांनी न्यायालयात दाद मागितली. या प्रकरणी लग्नापूर्वी आजार लपविणे हे घटस्फोटाचे कारण ठरू शकते, असं कोर्टाकडून सांगण्यात आलं.

सकाळ डिजिटल टीम

Hiding Physical Disorders before Marriage Basis of Divorce: मुलीला डोळ्याचा आजार होता. लग्नानंतर ते उघड झाल्याने संबंधितांनी न्यायालयात दाद मागितली. या प्रकरणी लग्नापूर्वी आजार लपविणे हे घटस्फोटाचे कारण ठरू शकते, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदविले.

एखादा मुलगा किंवा मुलगी लग्नापूर्वी असाध्य आजाराने ग्रस्त असल्यास याची माहिती त्यांनी लग्नाचा प्रस्ताव देतानाच समोरच्यांना द्यावी, असे म्हणत न्यायालयाने पत्नीची याचिका फेटाळली.

अकोला येथील रहिवासी असलेल्या या दांपत्यांचे १८ मे २०१७ रोजी लग्न झाले. या मुलीला लग्नाआधीच डोळ्याचा आजार होता. लग्नानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे लग्नाच्या तीन महिन्यानंतर पती-पत्नी वेगळे राहू लागले. तेव्हापासून पत्नी आई-वडिलांसोबत राहत आहे. दुसरीकडे, पत्नीला पतीसोबत राहायचे होते, त्यामुळे वैवाहिक हक्क बहाल करण्यासाठी पत्नीने अकोला कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल केली होती. दुसरीकडे पतीने घटस्फोटाची मागणी करत न्यायालयात याचिका दाखल केली.(Latest Marathi News)

अकोल्याच्या कौटुंबिक न्यायालयाने या दोन्ही याचिकांवर एकाचवेळी निकाल देताना पत्नीची याचिका फेटाळून पतीची याचिका मान्य केली. या निर्णयाला पत्नीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या प्रकरणावरील सुनावणीत न्यायालयाने सर्वांची बाजू ऐकून घेत अकोला कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत याचिका फेटाळून लावली.

पत्नीचा युक्तिवाद
पत्नीच्या म्हणण्यानुसार, लग्नानंतर ती सुखी वैवाहिक जीवन जगण्यासाठी पतीच्या घरी गेली. मात्र, सासरी पती मानसिक छळ करू लागला. पतीने आधी एमएस्सी अभ्यासक्रमाला प्रवेश देण्याचे मान्य केले होते. मात्र, नंतर अचानक प्रवेश शुल्क भरण्यास नकार दिला. यानंतर पतीने बहाणा करून तिला १७ ऑगस्ट २०१८ रोजी आई-वडिलांच्या घरी सोडले. तेव्हापासून मी माहेरी राहते. तिला पतीसोबत राहायचे होते. त्यामुळे तिने वैवाहिक हक्क बहाल करण्यासाठी याचिका दाखल केली होती. (Latest Marathi News)

पतीचा युक्तिवाद
पतीच्या याचिकेनुसार, पत्नी पेटोसिस या डोळ्याच्या आजाराने त्रस्त होती. गाढ झोपेतही तिचा डावा डोळा नेहमी उघडा असायचा. या आजाराची माहिती असूनही पत्नी आणि तिच्या पालकांनी ही वस्तुस्थिती लपवून माझी फसवणूक केली, असा दावा पतीने याचिकेत करीत घटस्फोटाची मागणी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Whatsapp Call Recording : मिनिटांत रेकॉर्ड करा व्हॉट्सॲप कॉल, सोपी स्टेप वाचा एका क्लिकमध्ये..

Margashirsha Amavasya 2024: मार्गशीर्ष अमावस्येच्या शुभ मुहूर्तावर करा गंगा स्नान, जाणून घ्या महत्व

SCROLL FOR NEXT