preparation for Navratri Festival in Agyaram Devi Temple Registration for Akhand Jyoti from IAS IPS officers across country Sakal
नागपूर

Nagpur News : आग्याराम देवी मंदिरात नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : शहरातील भोसलेकालीन तीनशे वर्षे जुन्या आग्याराम देवी मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. येथे यंदा देशभरातील आयएएस, आयपीएस व राजस्व अधिकारी तसेच न्यायमूर्ती आदींनी अखंड ज्योत प्रज्ज्वलित करण्यासाठी नोंदणी केली आहे.

आग्याराम देवी नागपूरकरांसाठी ग्रामदेवता असून, नवरात्रोत्सवात जवळपास चार लाख भाविक येतात. नवरात्रोत्सवात येथे अखंड ज्योत लावण्यासाठी शहरातील नागरिकांसोबतच देशभरातून मान्यवर नोंदणी करतात. यात शहरातील अनेकजण आयपीएस व आयएएस अधिकारी आहेत.

याशिवाय न्यायपालिकेतही अनेक जण महत्त्वाच्या हुद्द्यावर असून, ते शहराबाहेर कर्तव्य बजावत आहेत. त्यांच्याकडूनही येथे ज्योत प्रज्ज्वलित करण्यासाठी नोंदणी करण्यात आली आहे. विदेशी भाविकांनीही नोंदणी केली. यावर्षी जवळपास तीन हजार अखंड ज्योत प्रज्ज्वलित केली जाणार आहे. शहराबाहेरील बंगळुरू, गोवा, मुंबई, पुणे, वर्धा व यवतमाळ येथील नागरिकांनीही संपर्क करून अखंड ज्योत लावण्यासाठी नोंदणी केली.

मंदिर परिसरात भव्य शामियाना उभारला जात असून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. १५ ऑक्टोबरला घटस्थापनेसोबतच अखंड ज्योत प्रज्ज्वलित केली जाईल. २३ ऑक्टोबरला घट विसर्जन, २६ ऑक्टोबरला सायंकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत महाप्रसादाचे वितरण केले जाईल, असे आग्याराम देवी ट्रस्टचे सचिव महेशकुमार गोयल यांनी नमूद केले.

चांदीच्या सिंहासनावर देवी

गणेशपेठ येथील मध्यवर्ती बसस्थानकाजवळच आग्याराम देवीचे मंदिर आहे. येथे देवी प्रकट झाल्याची आख्यायिका आहे. मंदिराच्या गर्भगृहात ९० किलो चांदीने तयार करण्यात आलेल्या सिंहासनावर देवी आरुढ आहे. गर्भगृहाचे प्रवेशद्वार ५७ किलो चांदीचे असून आकर्षक कलाकृती करण्यात आली आहे.

मंदिराच्या एकूण १.१७ एकर जागेवर भाविकांसाठी विविध सुविधा तयार करण्याचे प्रस्तावित आहे. यात ज्योतभवन, धर्मार्थ दवाखाना आणि भाविकांच्या राहण्यासाठी धर्मशाळा प्रस्तावित आहे. नवरात्रोत्सवानंतर या सुविधांसाठी बांधकाम सुरू करण्यात येणार आहे. यासाठी ट्रस्टच्या माध्यमातून आवश्यक कामे केली जात आहेत. मंदिराच्या काही जागेवर अतिक्रमण असून, ते हटविण्यासाटी कायदेशीर लढाही सुरू आहे.

- महेशकुमार गोयल, सचिव, आग्याराम देवी ट्रस्ट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mukesh Ambani यांनी खरेदी केलं १००० हून अधिक कोटीचं विमान; देशात असं Jet कोणाकडेच नाही; काय आहे खास?

Yashasvi Jaiswal ने सुनील गावसकरांचा विक्रम मोडला, सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंगतीत जाऊन बसला

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

IND vs BAN 1st Test : Shakib Al Hasanचं 'काळा' धागा चघळण्यामागचं मॅजिक; दिनेश कार्तिकनं उलगडलं लॉजिक

Priyanka Gandhi: जेपी नड्डांच्या पत्राला प्रियंका गांधींचं उत्तर; म्हणाल्या, चुकीच्या भाषेचा वापर...

SCROLL FOR NEXT