नागपूर

अमरावती : ‘मोहाबँक’च्या संकल्पनेवर प्रश्नचिन्ह

मेळघाटातील आदिवासी बांधव नेटपासून वंचित

नारायण येवले

चिखलदरा (जि. अमरावती) : मोहफुलांपासून आदिवासींना मिळणारे उत्पन्न त्यांच्या रोजगाराचे साधन आहे. स्वच्छ आणि मातीविरहित मोहफुले जमा करणे व त्यातून विविध उत्पादने निर्माण करण्यासाठी प्रकल्प अधिकारी कार्यालय प्रयत्न करीत आहे. परंतु, अद्याप नेट तसेच आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले नसल्याचे आदिवासी बांधवांचे म्हणणे आहे. त्यामुळे मोहाबँकेच्या संकल्पनेवर प्रश्नचिन्ह लागले आहे.

या उपक्रमातून आदिवासी बांधवांना मोहफुले जमा करण्यासाठी जाळ्या, टोपले, बांबू साहित्य वाटप करणे आवश्यक आहे. मात्र, ते उपलब्ध न झाल्याने येथे हातानेच मोहफुले गोळा केली जात आहेत. त्यामुळे आदिवासी बांधवांना प्रचंड मेहनत करावी लागते. याबरोबरच मोहफुलांना मातीसुद्धा लागते. महिला बचतगट तसेच इतर सर्व महिला व गावातील इतर सुशिक्षित युवकांसह सर्व नागरिक मोहफुलांच्या वेचणीत सहभागी व्हावेत, यासाठी प्रकल्प अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. प्रकल्प अधिकारी यांची संकल्पना फार सुंदर आहे. त्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात मेहनतसुद्धा घेतली आहे.

मोहाची फुले वेचण्यासाठी झाडाखालची जमीन कचरा जाळून साफ करावी लागते. त्यातूनच जंगलाला आग लागते आणि वनविभाग व आदिवासींमध्ये संघर्ष सुरू होतो. यावर उपाय म्हणून त्यांना मोहाच्या झाडाखाली लावण्यासाठी जाळ्या व बांबू दिल्यास स्वच्छ आणि संग्रहित मोहफुलांचे उत्पादन मिळणार आहे. माती लागल्याने मोहफुलांमध्ये निर्माण होणारी बुरशीही टाळता येणार आहे.

रोजगाराची संधी

गडचिरोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात मोहफुलांच्या व्हॅल्यूअ‍ॅडिशनचा उपक्रम राबविला जात आहे. या फुलांपासून प्रोटिन पावडर, चॉकलेट, बिस्कीट, मोहा सरबत, जाम तसेच अन्य वस्तू तयार करण्यात आले आहेत. हा प्रयोग अमरावती जिल्ह्यातील आदिवासी भागांमध्ये झाल्यास रोजगार निर्मितीतून आदिवासी स्वावलंबी होईल.

८५ टक्के अनुदानावरील योजना

८५ टक्के अनुदान व मोहफुले संकलनासाठी जाळी उपलब्ध करून देण्याची ही योजना ९०० लाभार्थ्यांसाठी मंजूर केली आहे. लाभार्थ्यांनी जाळी खरेदी केल्याची खात्री पटल्यास त्यांच्या खात्यात १८७० रुपये रक्कम वर्ग करण्यात येणार आहे. त्याची तपासणी सुरू आहे, अशी माहिती सहायक प्रकल्प अधिकारी श्री. मेटकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT