railway ac coach incident minor girl abused by sports coach attendant beat police Sakal
नागपूर

Nagpur News : कोच अटेंडन्टने चिमुकलीला कोंडले शौचालयात; अश्लील चाळे केल्याने प्रवाशांनी चोपले, एसी कोचमधील घटना

सकाळ वृत्तसेवा

Nagpur News : पाटलीपूत्र एक्स्प्रेसच्या एसी कोचमध्ये कोच अटेंडन्टने नऊ वर्षांच्या चिमुकलीला शौचालयात कोंडून अश्लील चाळे केले. यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी अटेंडन्टला चांगलेच बदडले.

ही घटना मंगळवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली. लोहमार्ग पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मोहम्मद मुन्नू (३०) रा. चाकण, गया असे आरोपी अटेंडन्टचे नाव आहे. मुन्नू विवाहित असून त्याला एक चार वर्षांचा मुलगा आणि दोन वर्षांची मुलगी आहे.

नऊ वर्षापासून तो रेल्वेत कोच अटेंडन्ट आहे. एसी बोगीतील प्रवाशांना बेडरोल, ब्लॅकेट, बेडशिट देणे आणि गोळा करण्याचे काम तो करतो. कंत्राटदारांकडून त्याची नियुक्ती केलेली आहे. गाडी क्रमांक २२३५२ बेंगळुरू-पाटलीपूत्र सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये त्याची ड्युटी होती.

या गाडीने चिमुकली, तिची आई, आजी आणि भाऊ असे चौघेजण एसी डब्ब्यातून पाटण्याला जात होते. बुटीबोरी जवळ गाडी असताना चिमुकली लघुशंकेला गेली. बऱ्याच वेळपासून तिच्यावर नजर ठेवून असलेला आरोपी सुद्धा तिच्या पाठीमागे गेला.

ती शौचालयात जातात, क्षणाचाही विलंब न लावता आरोपीसुद्धा आतमध्ये गेला आणि दार बंद केले. या प्रकारामुळे चिमुकली घाबरली. त्याने तिच्याशी अश्‍लील चाळे केले. दार उघडताच ती रडत आईकडे गेली आणि घडलेला सारा प्रकार सांगितला.

कोच अटेंडन्टचे व्हेरिफिकेशन व्हावे

कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कोच अटेंडन्टची माहिती, कोणत्या गाडीत किती अटेंडन्ट व त्यांची नावे काय अशी संपूर्ण माहिती रेल्वे प्रशासनाला हवी. ती कंत्राटदाराने द्यावी. यापूर्वी सुद्धा अशा घटना घडल्या असून प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

प्रवाशांचा संताप

आई आणि आजीने बोगीतील प्रवाशांना माहिती दिली. संतापलेल्या प्रवाशांनी आरोपीला पकडून बेदम मारहाण केली. तसेच या घटनेची माहिती रेल्वे कंट्रोल आणि हेल्पलाईनवर दिली. लोहमार्ग पोलिसांचे पथक एक नंबरच्या फलाटावर आले. पीडित आरोपीला ताब्यात घेण्यात आले. अशी माहिती पोलिस निरीक्षक मनिषा काशीद यांनी दिली. बुधवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२१ September in History: राज्यातील भाजप-सेना वाद २५ वर्षांपूर्वीही होताच! १९९९ मध्ये काय झालं होतं?

Latest Marathi News Updates : श्रीलंकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात, सत्तापालटानंतर पहिल्यांदाच होत आहे मतदान

Eknath Shinde: ...विरोध काँग्रेसला भोवणार , तिसऱ्या कार्यकाळात महाराष्ट्र विकसाच्या वाटेवर

भोस्ते घाटात पुरुषाचा सापळा, कवटी अन् झाडाच्या फांदीवर लोंबकळणारी दोरी..; स्वप्नातल्या 'त्या' मृतदेहाचं गूढ कायम

Badlapur School Crime : बदलापूर प्रकरणात आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली; धक्कादायक माहिती आली समोर

SCROLL FOR NEXT