उमरेड विधानसभा क्षेत्रातील उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यात मतदान शांततेत पार पडले. उन्ह वाढल्याने दुपारनंतर मतदानाची गती मंदावली होती. एक्का दुक्का मतदार घराबाहेर पडताना दिसले. तीन वाजतानंतर मात्र मतदारांनी मतदान केंद्राबाहेर गर्दी करायला सुरुवात केली. ती सायंकाळी सहा वाजतापर्यंत कायम होती.
सकाळी नऊ वाजतापर्यंत सात टक्केही मतदान झाले नव्हते. नंतर मतदानाची गती वाढली. अकरा वाजेपर्यंत १८.४६ तर एक वाजतापर्यंत ३२.९७ टक्क्यांपर्यंत मतदान आटोपले होते. पाच वाजतापर्यंत ६० टक्के पेक्षा अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
युतीचे उमेदवार राजू पारवे यांनी उमरेड येथील केंद्रावर पत्नीसह मतदान केले. तर माजी आमदार सुधीर पारवे यांनी संपूर्ण कुटुंबीयांसोबत भिवापूर येथील बांधकाम विभागाच्या कार्यालयातील केंद्रावर मतदान केले. (Ramtek Constituency)
उमरेड तालुक्यातही मोठ्या प्रमाणात मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. उमरेड मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. मात्र, यावेळी फारसा उत्साह दिसून आला नाही. राजू पारवे यांना शिवसेनेने उमेदवारी दिल्यामुळे भाजप कार्यकर्ते आधीपासूनच नाराज होते. तर दुसरीकडे सुधीर पारवे यांना आपल्यावर वर्चस्व करणारा नेता नको होता. तसेच राजेंद्र मुळक यांनीही राजू पारवे नको असल्याने सुरुवातीपासूनच येथे कॉग्रेसने प्रचारात आघाडी घेतली होती. मतदानाच्या दिवशी सर्वत्र सामसूम दिसून येत होते. उमरेड मतदारसंघात ६० पेक्षा अधिक मतदान झाले. मात्र हे कोणाच्या पथ्यावर जाते हे मतमोजणीनंतर कळणार आहे.
काँग्रेस कार्यकर्ते सकाळपासूनच उत्साहात दिसले. घरोघरी भेटी देऊन मतदारांना मतदानाकरिता घराबाहेर पडण्यासाठी ते आग्रह करीत होते. त्यांचा हा उत्साह मतदानाची वेळ संपेपर्यंत कायम होता. या उलट स्थिती युतीच्या कार्यकर्त्यांची होती. सकाळी अनेक ठिकाणी भाजपसह सेना व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सक्रिय असल्याचे दिसत होते. नंतर जसजशी ऊन वाढत गेली, तसतशी त्यांची संख्याही रोडावली. एक्का दुक्का कार्यकर्तेच रस्त्यावर फिरताना दिसत होते. ही स्थिती उमरेडसह भिवापूर व कुही तालुक्यात सायंकाळपर्यंत बघायला मिळाली. मतदानादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्याची तिन्ही तालुक्यात नोंद नाही.
कुही तालुक्यातील बोरी नाईक ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या आवरमारा व आंभोरा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मेंढा (कला) येथील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार जाहीर केला होता. त्याप्रमाणे गावकरी आज आपल्या निर्णयावर ठाम राहिलेले आढळून आले. दोन्ही गावात कुणीही मतदानात भाग घेतला नाही. निवडणूक आयोगाने कोणत्याही गावाने मतदानावर बहिष्कार घालू नये, असे आवाहन केले होते.
मात्र, या गावातील समस्या सुटल्यामुळे ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. तो आजही कायम ठेवला. प्रशासनाला त्यांच्या समस्यांची जाणीव नसल्याचा आरोपही करण्यात आला.
मतदान आटोपल्यानंतर काँग्रेसच्या उमरेड येथील काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी स्वतःच आपला विजय जाहीर करीत इतवारी भागात रस्त्यावर फटाके फोडलेत. आचार संहिता असतानाही हा प्रकार घडल्याने मतदारांनी आश्चर्य व्यक्त केले. पोलिस विभागाकडे याकडे लक्ष नव्हेत. त्यामुळे हे फटाके कोणी फोडले हा संशोधनाचा विषय झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.