Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University Will Batu cause poor sakal
नागपूर

नागपूर : ‘बाटु’मुळे होणार विद्यापीठ कंगाल?

सरासरी ४० कोटींचा फटका; विविध योजनांवर प्रतिकूल परिणाम होणार

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : अभियांत्रिकी महाविद्यालयांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात समावेश होणार असल्याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला मिळणारा मोठा महसूल घटणार आहे. परीक्षा शुल्कातून येणारा पैसा बंद झाल्यास विद्यापीठाचा गाडा ओढणेही अवघड जाणार असल्याची चर्चा आहे.

विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कावर विद्यापीठाचे अर्थकारण चालते. त्यातही अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांकडून आकारण्यात येणाऱ्या परीक्षा शुल्काचा त्यात मोठा वाटा आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षेत ३ लाख ५० हजार तर उन्हाळी परीक्षेत ४ लाखावर विद्यार्थ्यांचा समावेश असतो. याशिवाय दरवर्षी त्यात १ लाखाहून अधिक विद्यार्थी नोंदणी करतात. या विद्यार्थ्यांच्या शुल्कातून ६० ते ६५ कोटीचा निधी महसूल रूपात विद्यापीठाला मिळतो.

नागपूर विद्यापीठाशी संलग्नित ३५ अभियांत्रिकी महाविद्यालये संलग्नित आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्काचे पैसे येण्यास बंद झाल्यास एकूण शुल्काच्या ७० टक्के शुल्क मिळणे बंद होणार आहे. त्यामुळे याचा परिणाम विद्यापीठाच्या विविध योजनांवर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, याबाबत कुलगुरूंना संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

असे आहे अर्थकारण

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात यंदा २०२१-२२ या वर्षात ९० हजारांवर विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. हिवाळी परीक्षेत ३ लाख ५० हजार तर उन्हाळी परीक्षेत ४ लाखांवर विद्यार्थ्यांचा समावेश असतो. याशिवाय दरवर्षी १० हजार विद्यार्थी गेल्या काही वर्षांपासून विविध अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेतात. चार वर्षीय अभ्यासक्रमात किमान ३० हजार विद्यार्थी दरवर्षी परीक्षा देतात. पारंपरिक अभ्यासक्रमांना २४० तर अभियांत्रिकी आणि इतर विषयांसाठी २७०० रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येते. परीक्षा शुल्कातून ६० ते ६५ कोटी विद्यापीठाला दरवर्षी मिळते. अभियांत्रिकी शाखा गाळल्यास एकूण शुल्काच्या ७० टक्के शुल्क मिळणे बंद होणार आहे.

१२ वर्षांपासून शुल्कवाढ थांबलेली

विद्यापीठाद्वारे २०१० मध्ये परीक्षा शुल्कात वाढ करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर आजपर्यंत शुल्कवाढ करण्यात आलेली नाही. याउलट कोरोनाकाळात दोन वर्ष विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्यात आले. त्यामुळे आधीच ५० कोटींचा फटका विद्यापीठाला बसलेला आहे.

विद्यार्थीही घटले

विद्यार्थी संख्येत सातत्याने होणारी घट आणि विषयनिहाय शुल्क वाढीचा निर्णयाने नागपूर विद्यापीठाचा महसुल तब्बल ३० ते ३५ कोटींनी घटला आहे. २०१८-१९ मध्ये प्रथम वर्षात केवळ १ लाख २० हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. ही नोंदणी २०१७-१८ मध्ये ही नोंदणी दीड लाखावर होती. यावर्षी नोंदणी ९० हजारावर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT