नागपूर

न्याय, नीतिमत्तेने वागल्यास विजय तुमचाच : न्यायमूर्ती सिरपूरकर

मंगेश गोमासे

नागपूर : ‘‘महाभारताचे युद्ध प्रारंभ होण्यापूर्वी गांधारीने ‘यतो धर्मः ततो जयाः’ असा उपदेश केला होता. अर्थात जेथे धर्म, न्याय आणि नीतिमत्तेचे अधिष्ठान असते तेथे विजय हमखास असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जीवनात नीतिमत्ता आणि न्याय या दोन तत्वांचा अंगीकार केल्यास विजय (Convocation Ceremony) तुमचाच आहे’’, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर (Former Supreme Court Justice Vikas Sirpurkar) यांनी केले. (Rashtrasant-Tukdoji-Maharaj-University's-108th-Convocation-Ceremony)

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने दीक्षान्त सभागृहात आयोजित १०८ व्या दीक्षान्त समारंभात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आभासी पद्धतीने उपस्थित होते. शुक्रवारी ऑनलाइन पद्धतीने झालेल्या सोहळ्यात माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांना ‘विधी पंडित’ (डॉक्टर ऑफ लॉ) या मानद पदवीने सन्मानित करण्यात आले. त्यांच्यावतीने चिरंजीव श्रीनिवास बोबडे यांनी पदवीचा स्वीकार केला.

न्या. सिरपूरकर पुढे म्हणाले, आपली ऊर्जा समाजासाठी सकारात्मक आणि फायदेशीर कार्यांसाठी वापरा. तरुणांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता नोकऱ्या कशा निर्माण करता येतील, यावर लक्ष केंद्रित करावे. नागपुरात उद्योगांचा चांगला वाव आहे. सौरऊर्जा, वनसंपत्ती, सामाजिक अभियांत्रिकी, जलसंधारण या क्षेत्रातही अधिक चांगले काम करण्याची संधी आहे.

२ डी.लिट.सह १८८ पदक, ७७,९१२ पदवी

दीक्षान्त समारंभात यावर्षी डॉ.रत्नाकर भेलकर आणि डॉ. टी.व्ही. गेडाम डी.लिट पदवीने सन्मानित करण्यात आले. याशिवाय १८८ पदके, पारितोषिके मिळाली असून त्यात १०७ विद्यार्थ्यांना सुवर्ण, ९ रौप्य, १९ पारितोषिके प्रदान करण्यात आली. याशिवाय ८६७ पीएच.डी., ६५ हजार ३४५ पदवी आणि ११ हजार ५१४ पदव्युत्तर पदवी अशा एकूण ७७ हजार ९१२ पदवी प्रदान करण्यात आल्या.

हे आहेत गुणवंत

  • प्राची अग्रवाल - ९ सुवर्ण आणि २ पारितोषिके, (बीएएलएलबी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय)

  • गौरी जोशी - ६ सुवर्ण आणि १ रौप्य पदक (एमएस.स्सी., रसायनशास्त्र विभाग)

  • आदित्य खोडे - ७ सुवर्ण पदके (एमबीए, डॉ. आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज)

  • पुनम बेलेकर - ६ सुवर्ण पदके (अंजुमन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग)

  • अमोल धाकडे - ६ सुवर्ण पदके (डॉ. आंबेडकर विचारधारा, डॉ. आंबेडकर विचारधारा विभाग)

१६ जुलैपर्यंत वितरण

१२ तारखेला विद्यार्थ्यांना पदकांनी सन्मानित करण्यात येणार आहे. याशिवाय १३ जुलैला विज्ञान व तंत्रज्ञान, १४ जुलैला वाणिज्य व व्यवस्थापन, १५ जुलैला मानव्यशास्त्र, १६ तारखेला आंतरशाखीय विद्याशाखेतील पीएच.डी. पदवीचे वितरण केल्या जाणार आहे.

(Rashtrasant-Tukdoji-Maharaj-University's-108th-Convocation-Ceremony)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्राच्या मतमोजणीला सुरुवात, पहिला कल आला हाती...

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: कोपरी पाचपाखाडीमधुन एकनाथ शिंदे आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT