Ratan Tata fake quote in hsc English paper sakal
नागपूर

बारावीच्या इंग्रजीच्या पेपरमध्ये टाटांचे फेक ‘कोट’!

शिक्षण मंडळाची बौद्धिक दिवाळखोरी उघडकीस

मंगेश गोमासे -सकाळ वृत्तसेवा

नागपूर : बारावीच्या परीक्षेत इंग्रजीच्या पहिल्याच पेपरमध्ये अनेक चुका असल्याचे एकीकडे निदर्शनास आले असताना, आता याच पेपरमध्ये शिक्षण मंडळाची बौद्धिक दिवाळखोरी उघडकीस आली आहे. मंडळाद्वारे पेपरमधील प्रश्‍न क्रमांक दोन ‘अ’ यातील ‘अनसिन पॅसेज’मध्ये चक्क टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा यांचे व्हॉट्सॲपवर फिरणारे चुकीचे ‘कोट’ टाकल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, या बाबत एका कार्यक्रमात त्यांनी हे ‘कोट’ माझे नसल्याचा खुलासाही केलेला आहे.

बोर्डाद्वारे शुक्रवारी सकाळी साडेदहा ते दोन वाजता दरम्यान इंग्रजीचा पेपर घेण्यात आला. सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास पेपर हाती आल्यावर त्यात अनेक चुका असल्याचे दिसून आले. यामुळे विद्यार्थी गोंधळात सापडले. या चुका असतानाच आता पेपरमधील प्रश्‍न क्रमांक २ मधील ‘अ’ मध्ये रतन टाटा यांच्या नावाने नेहमीच फेसबुक, व्हॉट्सअप आणि ट्विटरवर फिरणारे ‘I dont believe in taking right decisions, I take Decisions and make them right’ हे ‘कोट’ बोर्डाने वापरत त्या आधारावर पॅसेज तयार केल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र, प्रत्यक्षात हा ‘कोट’ माझा नाही असा खुलासा रतन टाटा यांनीच एका कार्यक्रमात केला होता. मात्र, बोर्डाने या ‘कोट’पासून अनसिन पॅसेजची सुरवात करुन व्हॉट्सअप विद्यापीठाला प्रमोट करण्याचे काम सुरू केले की काय? असा प्रश्‍न आता निर्माण झाला आहे.

या कार्यक्रमात केला होता खुलासा

एचईसी पॅरिस या बिझनेस स्कुलद्वारे सहा वर्षांपूर्वी टाटा उद्योग समूहाचे प्रमुख रतन टाटा यांना ‘हॉनोरिस कॉजा’ पदवीने सन्मानित करण्यात आले होते. या कार्यक्रमात त्यांनी दिलेल्या मुलाखतीदरम्यान निवेदिकेने याबाबत विचारणा केली होती. त्यावेळी त्यांनी हे ‘कोट’ माझे नसल्याचे स्पष्ट केले होते. याशिवाय ते माझा नावाने समाजमाध्यमांवर पसरविण्यात येत असल्याचे स्पष्ट केले होते.

काय आहेत निकष

कोणतेही अनसिन पॅसेज निवडताना काही निकष तपासावे लागतात. अनसिन पॅसेज अधिकृत व विश्‍वासहार्य असावे असा निकष असताना, या अनसिन पॅसेजची सत्यता न पडताळता सरसकट बारावीच्या इंग्रजीच्या पेपरमध्ये तब्बल पंधरा गुणासाठी यावर आधारित प्रश्‍न विचारण्यात आले. एका प्रकारे व्हॉट्सअप युनिर्व्हसिटीच्या खोट्या संदेशाला बोर्ड बळी पडले असल्याचे दिसून येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : 'किंगमेकर' किंवा 'स्पॉयलर' होण्यात मला रस नाही, अजित पवार असं का म्हणाले?

Latest Maharashtra News Updates : आमदार डॉ. मनीषा कायंदे यांची हुसेन दलवाईंवर टीका

Stock Market: शेअर बाजारात तेजी कधी येणार? मोतीलाल ओसवालने सांगितले बाजाराचे भविष्य

Big Updates: विराट कोहली, लोकेश राहुल दुखापतीमुळे पहिल्या कसोटीला मुकणार? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

कधी स्पॉटबॉयचं काम तर कधी अभिनेत्रींचे कपडे इस्त्री केले ; बॉलिवूडचा यशस्वी दिग्दर्शक रोहित शेट्टीचा डोळ्यात पाणी आणणारा स्ट्रगल

SCROLL FOR NEXT