Sudhir Mungantiwar  Esakal
नागपूर

Sudhir Mungantiwar : खोटे ‘नॅरेटिव्ह’ खोडण्यासाठी सज्ज व्हा; पदाधिकाऱ्यांना मुनगंटीवार यांचे आवाहन

रविभवन येथे आज झालेल्या नागपूर विभागातील सहा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी अनेक विषयांवर प्रकाश टाकला. विधानसभा निवडणुकीच्या काळात संघटन बळकट करण्याचे निदेंश त्यांली दिले.

सकाळ वृत्तसेवा

Nagpur News: खोटे नॅरेटिव्ह सेट करण्यास विरोधक यशस्वी झाल्याने लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे आता तो खोडून काढण्याची जबाबदारी आपली असल्याचा आवाहन वनमंत्री व पूर्व विदर्भाचे निरीक्षक सुधीर मुनगंटीवार यांनी पदाधिकाऱ्यांना केले. पूर्व विदर्भातील भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला ते संबोधित करीत होते.

रविभवन येथे आज झालेल्या नागपूर विभागातील सहा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी अनेक विषयांवर प्रकाश टाकला. विधानसभा निवडणुकीच्या काळात संघटन बळकट करण्याचे निदेंश त्यांली दिले. बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर उपस्थित होते. विरोधकांनी ''संविधान बदल''चा विषय लावून धरला होता.

याशिवाय, इतर मुद्यांनाही प्रभावीपणे जनतेपर्यंत नेले. हे सर्व ''फेक नॅरेटिव्ह'' असून, ते मतदारांच्या मनातून बाहेर काढण्यासाठी सत्याचा लढा उभारावा लागेल, असे आवाहन मुनगंटीवार यांनी दिले.

नवे प्रमुख नियुक्त करा

लोकसभा निवडणुकीत विदर्भात भाजपला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे आधी संघटन बळकट करण्यावर भर दिला जाणार आहे. विधानसभा निवडणूकीपूवीं संघटन बळकट असल्यास प्रभावी कामगिरी करता येईल, असे मत यावेळी मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.

तर या बैठकीत विधानसभा निवडणुकीवर तसेच उमेदवारीवर कोणतीच चर्चा झाली नसल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच बूथ प्रमुख, सुपर वॉरिअर यांचा कामाचा अहवाल घ्या. ज्या प्रमुखांच्या क्षेत्रात पक्षाचे नुकसान झाले, त्यांना तातडीने काढा, नवे प्रमुखांची तातडीने नियुक्ती करा अशाही सूचना बैठकीत देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.

प्रदेश प्रभारी घेणार आढावा

पुणे येथील बालवाडीत भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचे अधिवेशन झाले. गृहमंत्री अमित शाह यांनी त्यावेळी पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. या बैठकीचे पडसाद भाजपच्या विभागनिहाय आढावा बैठकीत उमटत आहे. विधानसभा निवडणुकीपुवीं संघटन तयारी व रचनेबद्दलचा आढावा खुद्द पक्षाचे प्रदेश प्रभारी व केंद्रीय मंत्री धर्मेंद्र यादव तसेच सहप्रभारी व रेल्वेमंत्री आश्विन वैष्णव घेणार असल्याचे कळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT