Latest Money News: आंतरराष्ट्रीयस्तरावर आलेली अस्थिरता, अमेरिकेच्या फेडरल बॅंकेचे धोरण, सुरक्षित गुंतवणुकीच्या मालमत्तेची मागणी वाढल्याने सोने आणि चांदीन्याच्या दरात आज वाढ झाली आहे. सणासुदीच्या दिवसात भारतात सोन्याची मागणी वाढलेली आहे. मागणी अधिक आणि आवक कमी असल्याने सोने आणि चांदीच्या दर नवीन विक्रम करण्याच्या गतीने वाढू लागले आहे.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने लोकांमध्ये प्रचंड उत्साह आणि उत्साहाचे वातावरण आहे. त्याचा परिणाम सराफा बाजारातही दिसून येत आहे. त्यामुळे मौल्यवान पिवळ्या धातूचे सोने उजळले आहे. सराफा बाजारातील उत्साहामुळे गेल्या दोन दिवसात भावात सुमारे १,४०० रुपयांनी वाढ झाली आहे. सराफा बाजारात तेजी आली आणि प्रति १० ग्रॅम ७२ हजार रुपयांवर पोहोचली. चांदीच्या दरातही वाढ झालेली आहे. चांदीही ८४ हजार रुपये प्रति किलो गेली आहे.
ज्वेलर्सकडून मागणी वाढल्याने सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. परदेशी बाजारात सोने प्रति औंस $1.30 ने वाढून $2,502.70 प्रति औंस या पातळीवर पोहोचले.
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ कमोडिटी विश्लेषक सौमिल गांधी यांनी सांगितले की, सुरक्षित गुंतवणुकीच्या मालमत्तेच्या मागणीत वाढ झाल्यामुळे मंगळवारी सोन्याच्या किमतीत वाढ झाली. याव्यतिरिक्त, या आठवड्याच्या सुरुवातीला इराण इस्रायलवर हल्ला करू शकतो अशी चिंता होती, ज्यामुळे सोन्याच्या सुरक्षित आश्रयस्थानाच्या गुंतवणुकीसाठी प्रीमियम वाढला.((Why did the price of gold increase in the international market?))
कमकुवत स्पॉट मागणी दरम्यान सट्टेबाजांनी सौद्यांचा आकार कमी केल्यामुळे मंगळवारी फ्युचर्स ट्रेडमध्ये सोन्याचा भाव 93 रुपयांनी घसरून 70,645 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजमध्ये, ऑक्टोबर डिलीव्हरीच्या कराराची किंमत 93 रुपये किंवा 0.13 टक्क्यांनी घसरून 70,645 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. यामध्ये 17,454 लॉटचे व्यवहार झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात, न्यूयॉर्कमध्ये सोन्याचा भाव 0.02 टक्क्यांनी वाढून 2,504.50 डॉलर प्रति औंस झाला.(Gold price Weak in Futures Market)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.