Relatives beat up a lover who was in love Nagpur cirme news 
नागपूर

तीन आठवड्यांपूर्वी झाले प्रेयसीचे लग्न, विरहात गाठले घर; मात्र, नातेवाईकांनी झाडाजवळच दिला प्रियकराला चोप

दिलीप गजभिये

खापरखेडा (जि. नागपूर) : खापरखेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या भानेगाव येथे लग्न झालेल्या प्रेयसीच्या विरहात पडलेल्या प्रियकराला नातेवाईकांनी चांगला चोप दिला. प्रियकराने सुद्धा प्रेयसीच्या एका नातेवाईकाला जखमी केल्याची घटना नुकतीच घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमाच्या विरहात असलेला यशवंत गोविंद यादव (वय ३०, रा. व्हेटनरी कॉलेज जवळ, सुरेंद्रगड, नागपूर) याचे नागपूरच्या छावणी परिसरातील एका मुलीशी मैत्री झाली. मौत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. मागील जवळपास पाच वर्षांपासून सदर प्रेयसीसोबत प्रेमसंबंध राहिले. प्रेयसी मुलगी लग्नाची असल्याने घरच्यांनी खापरखेडा जवळ असणाऱ्या भानेगाव परिसरातील एका मुलाशी तीन आठवड्यांपूर्वी रीतीरिवाजाप्रमाणे विवाह करून दिला.

मात्र, प्रियकर हा तिच्या विरहात मग्न असल्याने भेटायला शोधाशोध करीत होता. अचानक प्रेयसीच्या पत्ता लागल्यावर भानेगावात आला. घरही शोधले. मात्र, सरळ प्रेयसीच्या घरी जाणे शक्य नसल्याने मार्गावरच एका झाडाजवळ तब्बल दोन तास थांबला. परंतु, प्रेयसी ही प्रियकराला अजिबात दिसली नाही. त्यामुळे हताश होत कसबसा करू लागला.

आधीच काही नातेवाईकांना कुणकुण होती. नातेवाईकांना जसा प्रियकर झाडाजवळ दिसला त्याला चांगलाच चोप दिला. मात्र, हाणामारीत भेटीसाठी संतप्त असलेल्या प्रियकराने सुद्धा एका नातेवाईकाला धारदार ब्लेडसारख्या शस्त्राने गंभीर जखमी करून टाकले. भेट तर नाहीच. उलट सदर प्रकरण पोलिस ठाण्यात पोहोचले आणि पोलिसांनी नातेवाईक व प्रियकरावर गुन्हे दाखल केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan East Assembly Election 2024 Result Live: कल्याण पूर्वमध्ये उद्धव ठाकरे गटाला धक्का; सुलभा गायकवाड यांचा दणदणीत विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: महाराष्ट्रानं मतदान केलंय की ईव्हीएम नं केलंय; आदित्य ठाकरेंचा सवाल

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

SCROLL FOR NEXT