टेकाडी (जि.नागपूर): पारशिवनी तालुक्यातील निलज गावातील ७० वर्षीय महिलेचा मृत्यू शुक्रवारी कामठी स्थित खासगी रुग्णालयात झाला होता. केलेल्या चाचणी अहवालात ही महिला बाधित निघाली. रुग्णालय प्रशासनाकडून बाधित महिलेला उपचारादरम्यान मृत्यूनंतर कुणालाही तिच्या जवळ जाण्यास प्रतिबंध लावण्यात आला होता. अशात शुक्रवारी बाधित महिलेचा मृतदेह कामठी नगर परिषद प्रशासनाच्या स्वाधीन करण्यात आला होता. तिच्यावर निलज गावातील दहनघाटावर अंत्याविधी पूर्ण करताना प्रशासनातील कर्मचारी मृतदेह ग्रामस्थांच्या सूपूर्द करून निघून गेले. यावरून ग्रामस्थ आणि प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांत वाद निर्माण झाला. मग पुढे घडले असे…
अधिक वाचाः याला म्हणतात आत्मविश्वास! फेरमूल्यांकनात जुळ्यांचे गुण ‘सेम टू सेम'; दहावीच्या निकालात दुसऱ्या स्थानावर
प्रशासनाने भेटण्यास केला मज्जाव
सकवारबाई गणपत भुते(वय७०) असे असून त्यांच्यावर कामठी स्थित खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. भुते या गावातील परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ निलजच्या अध्यक्ष होत्या. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबद्दल विचारणा करणाऱ्या अनेकांनी रुग्णालयात रीघ लावली होती, परंतू रुग्णालय प्रशासनाकडून त्या बाधित असल्याचा हवाला देत कुणालाही पाहण्यास आणि भेटण्यास मज्जाव करण्यात आला होता. अशातच शुक्रवारी त्यांचे निधन झाले. त्यांचे मुखदर्शन देखील कुण्याही अनुयायी किंवा कुटुंबाला करू देण्यात आले नाही.
अधिक वाचाः मानोऱ्यात चितळाच्या शिकारीची बोंबाबोंब, मात्र निघाले कोंबडीचे मांस
आता मृतदेह बाधित नाही का?
रुग्णालय प्रशासनाने मृतदेह सील करून कामठी नगर परिषद प्रशासनाच्या स्वाधीन केला. निलज या त्यांच्या राहत्या गावी दहनघाटावर अंतिम विधी करिता मृतदेह कामठी प्रशासनाच्या वतीने पोहचविण्यात आला. ग्रामस्थांनी नियमानुसार लांबूनच अंतिम विधी प्रक्रियेत सहभागी होण्यास तयार झाले. मात्र रुग्णवहिकेतून आलेला मृतदेह सरणावर न रचता खालीच ठेवून ते निघून जात असताना ग्रामस्थांनी त्यांना संक्रमित मृतदेहावर अंतिम क्रियाकर्म करण्यास मज्जाव केला. यावरून ग्रामस्थांनी जिवंत असताना आम्हाला बाधितेला भेटू दिले नाही. मृत्यूनंतर मुखदर्शनही करू दिले नाही, असा सवाल करत मग आता मृतदेह संक्रमित नाही का, आता ग्रामस्थांना कोरोना संसर्गाची भीती नाही, असा सवाल करत कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. तुम्ही तोंडाला मास्क का लावले नाही, सगळे नियम कायदे आमच्यासाठीच काय, असा सवाल उपस्थित करून कामठी प्रशासन आणि निलज ग्रामस्थ असा वाद चांगलाच जुंपला. घटनेची माहिती कामठी तहसीलदार अरविंद हिंगे यांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन वाद शमविल्याने अनर्थ टळला. घडलेल्या प्रकारावर कामठी तहसीलदार यांच्याही संपर्क केला असता त्यांचा फोन लागला नाही.
संपादनःविजयकुमार राऊत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.